Sameer wankhade on shahrukh khan son aryan saam Tv
मनोरंजन बातम्या

Sameer Wankhede On SRK Son Aryan : 'पुन्हा संधी मिळाली तर...'; शाहरुख खानच्या लाडक्या आर्यनच्या अटकेवर समीर वानखेडेंचे मोठे वक्तव्य

Sameer Wankhede : 2021 साली शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे अधिकारी समीर वानखेडे होते त्यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sameer Wankhede : २०२१ साली जेव्हा कोरोनाची दुसरी लाट होती. त्यावेळी बॉलिवूडमध्ये वेगळेच भीतीचे वातावरण होते. कारण बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अटक केली. आर्यन खान जवळपास 25 दिवस तुरुंगात राहिला आणि नंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

यानंतर त्याची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, या प्रकरणाने बरेच लक्ष वेधले होते. यादरम्यान शाहरुख खान आणि समीर वानखडे यांच्यातील चॅट लीक झाल्या होत्या, त्याबद्दल समीरने त्या चॅट लीक केल्या नसल्याचे सांगितले. जेव्हा समीर वानखेडे यांना विचारण्यात आले की आर्यन खानच्या अटकेसाठी त्यांना टार्गेट करण्यात आले आहे का? तर ते म्हणाले , 'मला टार्गेट केले गेले असे मी म्हणू शकत नाही, पण मी भाग्यवान आहे की मला मध्यमवर्गीय लोकांचे प्रेम मिळाले'.

आर्यनच्या अटकेवर समीर वानखेडे म्हणाले, 'कधीकधी मला वाटतं की जे झालं ते ठीक होतं कारण मला लोकांच खूप प्रेम मिळालं.' मोठे लोकही नियमांच्या वर नाहीत, असेही ते म्हणाले. त्याला कोणताही पश्चात्ताप नाही आणि जर त्याला पुन्हा संधी मिळाली तर तो तेच करेल. शाहरुख खानच्या लीक झालेल्या चॅट्सवर समीर वानखेडे म्हणाले की, मी याबद्दल बोलू शकत नाही, कारण त्याने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले आहे. मात्र, त्या चॅट्स आपण लीक केले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वानखेडे म्हणाले, 'मी चॅट लीक करण्याइतका कमकुवत नाही'.

चॅट लीक प्रकरणावर समीर काय म्हणाले?

चॅट लीक करून शाहरुख आणि आर्यनला पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर समीर वानखेडे म्हणाले, 'ज्याने हे केले त्यांना पुन्हा संधी मिळाली तर मी अजून प्रयत्न करायला सांगेन'. समीर वानखेडे यांना जेव्हा विचारण्यात आले की त्यांच्या टीमने आर्यन खानला त्रास दिला का? त्यावर ते म्हणाला, 'मला वाटत नाही की मी कोणत्याही मुलाला अटक केली आहे. भगतसिंग यांनी वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले, तुम्ही त्यांना मुलगा म्हणू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT