Jawan 4th Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan 4th Day Collection: ‘जवान’ने पहिल्याच विकेंडला रचला इतिहास, रविवारी कमाईच्या आकड्याने गाठला उच्चांक

Jawan Box Office Collection: पहिल्याच विकेंडला चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल....

Chetan Bodke

Jawan 4th Day Box Office Collection

शाहरुख खानच्या ‘जवान’ची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच प्रकाशझोतात राहिलेल्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला आजही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

प्रदर्शनाच्या आधीही आणि प्रदर्शनाच्या नंतर देखील चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्याच विकेंडला चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईबद्दल....

शाहरुख आणि नयनताराच्या ‘जवान’ला प्रेक्षकांकडून पहिल्या दिवशी तब्बल १० चित्रपटांच्या कमाईचा आकडा पार करत ‘पठान’, ‘गदर २’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ यांसारख्या हिट चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. चित्रपटाची चर्चा एकट्या भारतात नाही तर, जगभरात होत आहे. नुकतंच सॅकल्निक या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने चौथ्या दिवशी आणि विकेंडच्या पहिल्या रविवारी तब्बल ८१ कोटींची कमाई केली आहे.

जबरदस्त स्टारकास्ट, उत्तम अभिनय, दमदार कथा अशी विविध केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटामध्ये असलेल्या धमाकेदार सीन्सची सोशल मीडियावर तुफान कौतुक केलं जात आहे. त्यामुळेच चौथ्या दिवशीही ‘जवान’ची छप्परफाड कामगिरी बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी एकूण ८१ कोटींची कमाई केली आहे.

हिंदी भाषेत चित्रपटाने ७२ कोटी आणि उर्वरित तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये चित्रपटाने कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशीच चित्रपटाने २०० कोटींच्या पल्ला गाठला आहे. लवकरच येत्या काही दिवसात चित्रपट ३०० कोटींचाही टप्पा गाठेल. चित्रपटाची आतापर्यंत एकूण २८७. ६ कोटींचा आकडा गाठलाय.

चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. चित्रपट ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT