Jawan OTT Release Date Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Jawan OTT Release: हजार कोटींची कमाई करणारा शाहरुखचा 'जवान' UNCUT रिलीज होणार, कधी, कुठे? वाचा एका क्लिकवर

Jawan On OTT: प्रेक्षक 'जवान' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Pooja Dange

Jawan OTT Release Date Out:

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे. चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे.

प्रेक्षकांना या चित्रपटाचा पुन्हा - पुन्हा आनंद घ्यायचा आहे. चित्रपटाची कथा इतकी सुंदर आहे की कोणाला हा चित्रपट सारखासारखा पाहण्याची इच्छा होईल. त्यामुळे प्रेक्षक 'जवान' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 'जवान' तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.

काही दिवसांपूर्वीची 'जवान'चे डिजिटल राईट्स नेटफ्लिक्सने विकत घेतल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे थिएटरनंतर आता 'जवान' थेट नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. नेटफ्लिक्सचे सब्स्क्रिप्शन असणाऱ्या प्रेक्षकांना घर बसल्या 'जवान'चा आनंद घेता येणार आहे. (Latest Entertainment News)

नेटफ्लिक्सने 'जवान'चे डिजिटल राईट्स विकत घेण्यासाठी खूप मोठी रक्कम मोजली आहे. 'जवान'चे निर्माते आणि नेटफ्लिक्स यांच्यात ही डील २५० कोटींना झाली असल्याचे मीडिया अहवालात सांगण्यात आले आहे. 'जवान' ओटीटीवर शाहरुख खानच्या वाढदिवशी येईल, असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच २ नोव्हेंबर, २०२३ रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

७ सप्टेंबरला जन्माष्टमी मुहूर्तावर 'जवान' चित्रपट प्रदर्शित झाला. एका महिन्यात या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 'जवान' चित्रपटाने देशभरात ६१८ कोटी रुपयांपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे. तर जगभरात या चित्रपटाने ११०० कोटींचा आकडा देखील पार केला आहे.

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत अॅटलीने एक खुलासा केला होता. यामध्ये अॅटलीने चाहत्यांना मोठे सरप्राईज देण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते. 'जवान' ओटीटीवर अनकट प्रदर्शित होणार आहे. जे जे सीन्स सेंसॉर बोर्डाच्या नियमात बसत नसल्याने कापण्यात आले होते त्याच्यासहित 'जवान' OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अॅटली सध्या 'जवान'च्या ओटीटी व्हर्जनमध्ये बनविण्यात बिजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT