Suhana Khan And Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suhana Khan And Shah Rukh Khan: किंग खानच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर जलवा; शाहरुख म्हणतो ‘हे तर माझ्यामुळेच शक्य...’

किंग खानची लेक सुहाना खान बॉलिवूडमध्ये किंवा इतर कोणत्या इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी, ती एक आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर झाली आहे.

Chetan Bodke

Suhana Khan International Brand Brand Ambassador: किंग खानची लेक सुहाना जरी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, ती नेहमीच चर्चेत असते. सुहाना अनेकदा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रकाशझोतात असते. नुकतीच ती जरी बॉलिवूडमध्ये किंवा इतर कोणत्या इंडस्ट्रीत सक्रिय नसती तरी, ती एक आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर झाली आहे.

नुकतीच सुहाना न्यूयॉर्कमधील एका ब्युटी ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर बनली. सध्या तिचे त्या शो मधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नुकताच मुंबईमध्ये झालेल्या एका मीडिया इव्हेंटमध्ये सुहानाने आंतरराष्ट्रीय ब्रँडची ती ब्रँड ॲम्बेसेडर होणार असल्याची माहिती दिली. सुहाना न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे.

शाहरुखने आपल्या लेकीसाठी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्या शो मधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला आपल्या स्टाईलने एक हटके कॅप्शन देखील दिले. कॅप्शन देत किंग खान म्हणतो, “‘मेबलिन’ या आंतरराष्ट्रीय ब्रँड जाहिरातीत झळकल्याबद्दल माझ्या लाडक्या लेकीचे अभिनंदन. तू त्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. खूपच चांगल्या पद्धतीने संभाषण सादर केलंस. तुझं कशाप्रकारे अभिनंदन करू हे मला समजत नाही. लव्ह यू माय लिल लेडी इन रेड!” असे शाहरुख खानने म्हटले आहे. (Latest Marathi News)

यावेळी शाहरूखच्या लेकीने सुहानाने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याने माध्यमांसमोर संवाद साधला. यावेळी ती म्हणली, “सर्वांना नमस्कार, मी पहिल्यांदाच एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याने खूप उत्साहित आहे, त्या प्रोडक्टसाठी आम्ही जे काही शूट केले आहे ते तुम्ही लवकरच पाहावे, अशी माझी इच्छा आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून या ब्रँडचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे.” असं माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणली. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांची मोठी मागणी

Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT