आर्यन खानच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. Saam Tv
मनोरंजन बातम्या

आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात (Video)

आर्यन खानच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी कार्डिलिया क्रूझ प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला विशेष एनडीपीएस न्यायालयाचे व्हि व्हि पाटील न्यायमूर्तींनी जामीन नाकारला आहे. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज आर्थर रोड तुरुंगात पोहोचला आहे.

सकाळी ९.१५ च्या दरम्यान शाहरुख खानआर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता. या दोघांमध्ये २० मिनिट चर्चा झाली. करोना काळात जेल बंद असल्याने नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. नातेवाईकांना आता कैद्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT