Legal Notice To Haq Saam Tv
मनोरंजन बातम्या

Haq Movie: इमरान हाश्मी आणि यामी गौतमचा 'हक' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; कायदेशीर नोटीस पाठवली, नेमकं प्रकरण काय?

Legal Notice To Haq: इमरान हाश्मी आणि यामी गौतमचा 'हक' चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शाह बनोच्या मुलीने चित्रपाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Shruti Vilas Kadam

Legal Notice To Haq: इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांचा आगामी चित्रपट "हक" प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शाह बानोची मुलगी सिद्दिका बेगम हिने निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये चित्रपटाचे प्रमोशन आणि रिलीज तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट शाह बानो प्रकरणावर आधारित आहे.

नोटीसमध्ये काय आहे?

नोटीसनुसार, सिद्दिका बेगम यांचा आरोप आहे की दिवंगत शाह बानो बेगम यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या कायदेशीर वारसांच्या परवानगीशिवाय चित्रित केले जात आहे. ही कायदेशीर नोटीस दिग्दर्शक सुपरन वर्मा, निर्माते जंगली पिक्चर्स आणि बावेजा स्टुडिओज तसेच सीबीएफसी यांना पाठवण्यात आली आहे.

हा चित्रपट एका खटल्यावर आधारित आहे

माध्यमांच्या वृत्तानुसार, "हक" हा चित्रपट १९८५ च्या सर्वोच्च न्यायालयातील मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम या खटल्यावर आधारित आहे. हा खटला महिला हक्क आणि देखभाल कायद्यांशी संबंधित आहे. मुस्लिम महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याच्या लढाईत हा खटला एक महत्वाचा मुद्दा मानला जातो.

चित्रपटाबद्दल

सुपर्ण एस. वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांच्यासोबत वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी यांच्या भूमिका आहेत. जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची निर्मिती विनीत जैन, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि हरमन बावेजा यांनी केली आहे. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT