Most Awaited Films And Web Series September 2023 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Most Awaited Films And Web Series September 2023: सप्टेंबरमध्ये ओटीटी धारकांचे होणार फुल्ल टू मनोरंजन, वेगवेगळ्या धाटणींचे चित्रपट आणि वेबसीरीज ठरेल चाहत्यांसाठी पर्वणी

Most Awaited Films And Web Series September 2023: सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे आणि वेगवेगळ्या आशयाच्या वेब सीरिज पाहायला मिळणार आहेत.

Chetan Bodke

Most Awaited Films And Web Series September 2023

२०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक दमदार आणि हिट चित्रपटांची चर्चा ऐकायला मिळत आहे. अशातच या महिन्यात ‘गदर २’, ‘OMG 2’, ‘ड्रीम गर्ल २’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. सोबतच ओटीटीवर देखील सुष्मिता सेनची ‘ताली’ ची ही ओटीटीवर आणि सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

आता प्रेक्षकांना या सप्टेंबर महिन्यात मनोरंजनासाठी काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लागली. या महिन्यात ओटीटीवर कोणकोणत्या वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. यावर एक नजर टाकुया.

येता सप्टेंबर महिना फक्त चित्रपटासाठीच नाही तर वेब सीरिजसाठीही खास आहे. सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांना वेगवेगळ्या धाटणीचे आणि वेगवेगळ्या आशयाच्या वेब सीरिज पाहायला मिळणार आहेत.

हड्डी (Haddi)

अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित ‘हड्डी’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तुफान चर्चा सुरू आहे. हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत नवाझुद्दीन सिद्दीकी आहे.

बंबई मेरी जान (Bambai Meri jaan)

क्राईम ड्रामा असलेली ‘बंबई मेरी जान’ ही वेब सीरिज येत्या १४ सप्टेंबरला ‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. उत्कंठावर्धक असलेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कथेच्या माध्यमातून चांगलीच ताणून धरली होती. वेबसीरिजचे तब्बल १० एपिसोड असून वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत केके मेनन, अविनाश तिवारी, कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य आणि अमायरा दस्तूर दिसणार आहेत.

स्कॅम २००३ (Scam 2003)

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज १ सप्टेंबर रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. देशाला हादरवून सोडणारी ही घटना पत्रकार संजय सिंह यांच्या 'रिपोर्टर्स डायरी' या हिंदी पुस्तकातून घेण्यात आली आहे.

द फ्रीलांसर (The Freelancer)

नीरज पांडे निर्मित आणि भाव धुलिया दिग्दर्शित ‘द फ्रीलांसर’ वेबसीरिज १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाली आहे. अनुपम खेर, मोहित रैना आणि काश्मीर परदेसी या दिग्गज कलाकारांची फौज आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. (Entertainment News)

काला (Kaala)

बेजॉय नांबियार निर्मित आणि दिग्दर्शित ‘काला’ ही वेबसीरिज येत्या १५ सप्टेंबरला ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे. अविनाश तिवारी, रोहन विनोद मेहरा, हितेन तेजवानी, ताहेर शब्बीर आणि निवेथा पेथुराज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (OTT)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT