Pandit Bhalchandra Deo  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pune: ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं.भालचंद्र देव यांचे निधन

आज पहाटे ३ वाजता पं.भालचंद्र दामोदर देव यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी निला देव, कन्या आणि शिष्या सौ.चारुशीला देव, मुलगा चित्तरंजन देव आहेत. त्यांचेवर आज (११ जानेवारी) सकाळी दहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - जेष्ठ व्हायोलीन वादक पं.भालचंद्र दामोदर देव (Bhalchandra Damodar Deo) यांचे निधन झाले आहे. आज पहाटे ३ वाजता पं.भालचंद्र दामोदर देव यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी निला देव, कन्या आणि शिष्या सौ.चारुशीला देव, मुलगा चित्तरंजन देव आहेत. त्यांचेवर आज (११ जानेवारी) सकाळी दहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी ९ जानेवारीला त्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. त्याच कार्यक्रमात अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने दिनानाथ रुग्णालयात (Hospital) हलविले. (Pandit Bhalchandra Deo Passed Away)

हे देखील पहा -

नंतर संजीवनी रुग्णालयात आय सी यु मध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यातच त्यांची तब्येत बिघडली. रात्री ३च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पं. भालचंद्र देव नाना म्हणून संगीत क्षेत्रात ओळखले जात. पं. गजाननराव जोशी यांचे ते शिष्य होते. पुण्यात (Pune) त्यांनी अनेकविध कार्यक्रमतुन साथ केली. भारत गायन समाजात पन्नास वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना व्हायोलीनचे धडे दिले. आजही ते अनेकांना व्हायोलिन शिकवीत होते. शिस्तशीर आयुष्य आणि गुरुंवरची अढळ श्रद्धा हेच त्यांचे प्रमुख गुण होते. ते आदर्शवत आयुष्य जगले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT