Pyarelal wife Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pyarelal wife Death: ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर; पत्नी सुनीला शर्मा यांचे निधन, संगीतविश्वात हळहळ

Pyarelal wife Death: ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या पत्नी सुनीला शर्मा यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह संगीतविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shruti Vilas Kadam

Pyarelal wife Death: ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल' या अजरामर संगीतकार जोडीतील प्यारेलाल यांच्या पत्नी सुनीला प्यारेलाल शर्मा यांचे 12 जुलै रोजी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत शांतपणे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टद्वारे देण्यात आली असून, संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

गायिका प्रियांका मित्रा यांनी सोशल मीडियावर शर्मा कुटुंबीयांचा संदेश शेअर करत सुनीला शर्मा यांच्या निधनाची माहिती दिली. या संदेशात, "आमच्या लाडक्या 'अम्मा' सुनीला प्यारेलाल शर्मा यांनी 12 जुलै रोजी कुटुंबीयांच्या सहवासात शांतपणे या जगाचा निरोप घेतला," असे लिहिले होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले असल्याचेही या संदेशात म्हटले आहे.

सुनीला शर्मा या गायिका नसल्या तरी, पती प्यारेलाल यांच्या संपूर्ण संगीत प्रवासात त्या त्यांच्या खंबीर साथीदार होत्या. गेल्या काही वर्षांत त्या अनेक संगीत रिअॅलिटी शोमध्ये प्यारेलाल यांच्यासोबत दिसल्या होत्या. 'इंडियन आयडॉल 13', 'सा रे ग म प' आणि 'सुपरस्टार सिंगर' यांसारख्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेष उपस्थिती लावली होती. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे, आरती करणे आणि आपुलकीने संवाद साधणे यामुळे त्या प्रेक्षकांच्याही परिचयाच्या झाल्या होत्या.

सुनीला शर्मा यांच्यावर 13 जुलै रोजी मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: खासदार कंगना रनौतला चोपलं?; Gen Z ना गटारछाप बोलल्याने मारहाण?

अभिजीत दिपकेंच्या भेटीवरून महायुतीत वाद; भाजपकडून संजय शिरसाठ-कडूंवर कारवाईची मागणी

'तुम्ही कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार?' काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डिवचलं

Pradeep Rawat Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! ब्रँडेड दारूच्या फ्लेवर्सवर बंदी,काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT