Karan Johar  saam tv
मनोरंजन बातम्या

Karan Johar Angry : 'या' स्टार किडवर रागावला करण जोहर, थांबवले चित्रपटाचे शूटिंग

'स्क्रू ढीला'चा स्टार किड टायगर श्रॉफच्या फीबद्दल करण जोहरसोबत अनेक मतभेद होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर(Karan Johar) त्याच्या 'कॉफी विथ करण'या ओटीटी शोसाठी प्रत्येक एपिसोड एक ते दोन कोटी रुपये घेतो. तसेच बिग बजेट सिनेमा ही त्याची खासियत आहे. त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'स्क्रू ढीला'(Screw Dheela) या चित्रपटाची मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. करण जोहर बॉलिवूडमधील नेपोटिझमला नेहमी प्रोत्साहन देत असतो. परंतु 'स्क्रू ढीला'चा स्टार किड टायगर श्रॉफच्या फीबद्दल त्यांच्यात अनेक मतभेद होत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार करण जोहर जॅकी श्रॉफच्या मुलाला योग्य ती फी द्यायला तयार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायकॉट बॉलिवूड या ट्रेंडपूर्वी करणने टायगर श्रॉफला 'स्क्रू ढीला' या चित्रपटासाठी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती. चित्रपटाचा टीझरही तयार करण्यात आला, पण सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या टीझरला देखील नापसंत करण्यात आले त्यामुळे करण जोहरने टायगरसमोर फी कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला.

वृत्तानुसार, करण जोहरने टायगर श्रॉफला 'स्क्रू ढीला'या चित्रपटात २० कोटींमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती, परंतु टायगरने ते मान्य केले नाही. हा चित्रपटही बिग बजेटचा असून टायगरने सहकार्य करावे, असे करणने सांगितले. पण टायगरला हा प्रस्ताव मान्य नव्हता. परिणामी, करणने चित्रपटाचं शूटिंग तूर्तास थांबविण्याचा निर्णय घेतला.

आपल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली की नाही हे लक्षात न घेता चित्रपटांमध्ये अभिनय करणारे नवोदित कलाकार अचानक फी वाढवतात याबद्दल करणने गेल्या वर्षभरात नाराजी व्यक्त केली आहे.

करण जोहरने २०२१ मध्ये एका मुलाखतीत म्हटले होते की, 'ज्या नवोदितांना अद्याप बॉक्स ऑफिसवर अजून स्वत:ला सिद्ध करायचे आहे, ते एका चित्रपटासाठी आमच्याकडे २० ते ३० कोटी रुपये मागत आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT