Urmi Trailer Launch Saam TV
मनोरंजन बातम्या

Urmi Trailer Launch: प्रेयसीच्या येण्याने चिन्मय उदगीरकरच्या वादळ येणार; "उर्मी" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Marathi Movie Trailer: 'उर्मी' हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Pooja Dange

Sayali Sanjeev New Movie: मराठी रसिकांसाठी अनेक नवीन चित्रपट नवीन विषयांसह प्रदर्शित होत आहेत. कधी प्रेम करायला शिकवणारे, कधी खळखळून हसवणारे, कधी विचार करायला लावणारे तर कधी प्रश्न विचारायला भाग पडणारे चित्रपट कलाकार मंडळी घेऊन येत असतात. अशाच एक वेग विषय घेऊन 'उर्मी' हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला खरंच विचार करायला लावणारा आहे. कारण या ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत. एक्स-गर्लफ्रेंड, मित्र, पत्नी आणि कौटुंबिक जीवनात आलेलं वादळ हे सर्व तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मित्राची एक वेगळी बाजू या ट्रेलरमध्ये दिसत आहे. चित्रपटातील गाण्यांविषयी बोलायचे झाले तर रसिक सुनीलवर चित्रित एक गाणे, एक रोमँटिक गाणे यांची झलक या ट्रेलर तुम्हाला दिसेल.

समृद्धी क्रिएशनने 'उर्मी' चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विजय गटलेवार आणि उत्पल चोधरी यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावलीय.

चित्रपटात अभिनेत्री रसिका सुनील, सायली संजीव अभिनेता चिन्मय उदगीरकर, नितीश चव्हाण, माधव अभ्यंकर, सायली पराडकर, तृप्ती देवरे, संतोष शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट असून ऋतुजा जुन्नरकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.

"उर्मी" या चित्रपटात नाती, प्रामाणिकपणा, विश्वास, प्रेम, मैत्री हे बिंदू जोडत एक उत्तम कथा साकारली आहे. पती-पत्नी यांच्या नात्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे काय घडते ? असं चित्रपटाचं कथासूत्र आहे.

नायकाचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू असताना आधीची प्रेयसी नायकाच्या आयुष्यात बाळासह परतते. तिचा दावा असतो की जन्माला आलेलं बाळ नायकाचंच आहे. आता नायकाच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्यापासून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात.

१४ एप्रिलला चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT