Sayali Sanjeev And Rishi Saxena Upcoming Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Sayali Sanjeev Upcoming Movie: ‘काहे दिया परदेस’मधली सायली- ऋषीची जोडी पुन्हा एकत्र, ‘या’ चित्रपटातून येणार भेटीला

Upcoming Marathi Movie: सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी लवकरच मालिकेनंतर आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत.

Chetan Bodke

Sayali Sanjeev And Rishi Saxena Upcoming Movie

‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी टेलिव्हिजन स्क्रीनवरील सर्वाधिक गाजलेल्या जोड्यांपैकी एक होती. ‘काहे दिया परदेस’ ही मालिका चांगलीच गाजली असून दोघांनाही या मालिकेने बरीच प्रसिद्धी मिळवून दिली होती.

मालिकेमध्ये सायलीने गौरीचे पात्र तर ऋषी सेक्सेनाने शिवचे पात्र साकारले होते. ही जोडी मालिकेनंतर आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहेत. ‘समसारा’ या चित्रपटातून ही जोडी एकत्र दिसणार आहे. (Bollywood)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘समसारा’ (द वॉम्ब) या चित्रपटामध्ये सायली आणि ऋषी हे दोघेही एकत्र दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. चित्रपटाची कथा अतिशय अनोखी आहे. गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असूर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अत्यंत वेगळी कथा असलेल्या या चित्रपटामध्ये उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. (Bollywood Film)

संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांनी त्या चित्रपटाची निर्मिती केली असून सागर लढे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सागर लढे, विश्वेश वैद्य, समीर मानेकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून समीर मानेकर, सागर लढे यांनी पटकथा रचली आहे. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT