Mohammad Nazim social Media
मनोरंजन बातम्या

Mohammad Nazim: 'माझा आयुष्यातील सर्वात वाईट दिवस'; वडिलांच्या निधनानंतर 'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्याची भावनिक पोस्ट

Mohammad Nazim: 'साथ निभाना साथिया' फेम मोहम्मद नजीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद नजीमच्या वडिलांचे सोमवारी निधन झालं.

Vishal Gangurde

Mohammad Nazim:

'साथ निभाना साथिया' फेम मोहम्मद नजीमवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद नजीमच्या वडिलांचे सोमवारी निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर मोहम्मद नजीमने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. (Latest Marathi News)

नजीमचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसाआधीच मोहम्मदने वडिलांची प्रकृती सुधरावी, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर मोहम्मद नजीमने त्यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट केली आहे.

वडिलांच्या आठवणीत पोस्ट करताना मोहम्मद म्हटला की, माझ्या वडिलांचे काल दुपारी निधन झालं. ते मला सोडून गेले, हा माझा आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मी काही दिवसांसाठी मक्का,सऊदीला जाण्यासाठी प्लानिंग केली होती. मी आज माझे आई आणि वडील या दोघांना गमावलं आहे. मला आता वाटत आहे की मला काही वेळासाठी मागे जाता आलं असतं तर बरं झालं असतं, असं तो पुढे म्हणाला.

'मला माहीत आहे की, माझे आई आणि वडील या दोघांचही माझ्यावर लक्ष असेल. मी नशीबवान मुलगा आहे, मला दोघेही भेटले, असंही मोहम्मद म्हणाला.

तत्पूर्वी, अभिनेता मोहम्मद नजीम हा 'साथ निभाना साथिया' या लोकप्रिय मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. अभिनेता मोहम्मद याच्यासोबत जिया मानेक आणि देवोलीना भट्टाचार्य या दोन अभिनेत्री काम करत आहेत. अभिनेता मोहम्मद नजीमही सोशल मीडियावर सक्रिय असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

Mumbai Metro 5A: आनंदाची बातमी! लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, उल्हासनगरपर्यंत धावणार 5A मेट्रो; कधीपर्यंत होणार सुरू?

Maharashtra News Live Update: नाशिकरोडमध्ये धक्कादायक प्रकार, तक्रार न घेतल्याच्या रागातून युवकाचा टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT