Mugdha- Prathamesh Haldi Ceremony Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mugdha- Prathamesh Haldi Ceremony: प्रथमेश-मुग्धाच्या घरी लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो व्हायरल

Priya More

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate:

'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (saregampa) फेम प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) - मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघाच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असून आता लग्नाच्या विधीला देखील सुरूवात झाली आहे. नुकताच या दोघांच्या घरी हळदी समारंभ पार पडला. मुग्धाने प्रथमेशच्या नावाची हळद लावली. या दोघांचे देखील हळदी समारंभाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या घरी पारंपारिक पद्धतीने हळदी समारंभ पार पडला. दोघांनी देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगली पसंती दिली असून ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मुग्धाने इन्स्टाग्रामवर हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'हरिद्रा लापन । घाणा भरणे', असे लिहिले आहे. या फोटोंमध्ये मुग्धाच्या घरामधील सर्वजण दिसत आहेत. मुग्धासोबत तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य खूपच आनंदी दिसत आहेत. तर प्रथमेशने देखील हळदी समारंभाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'हरिद्रा लापन । मांगलिक स्नान', असे लिहिले आहे.

प्रथमेश आणि मुग्धाने काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश लघाटेने १५ जूनला आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर मुग्धासोबतचा फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. काही दिवसांपूर्वी प्रथमेश आणि मुग्धा यांनी आपआपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी 'वाङ्निश्चय' असं लिहिलं होतं. हे फोटो पाहून दोघांनीही गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

दरम्यान, 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर ओळख होऊन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार निवडणारी प्रथमेश आणि मुग्धा ही दुसरी जोडी आहे. यापूर्वी रोहित आणि जुईली यांची या शोच्या मंचावर भेट झाली. आधी मैत्री नंतर प्रेम असं करत दोघांनी लग्न केले. त्यानंतर आता प्रथमेश आणि मुग्धा यांची जोडी जमली असून ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आता प्रथमेश आणि मुग्धा लग्न करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

SCROLL FOR NEXT