Rakhi Sawant And Sara Ali Khan Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan-Rakhi Sawant Video: राखी जरा जपून, सारा पडली असती ना! व्हिडिओ व्हायरल

Rakhi Sawant Drama: सारा अली खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Sara Ali Khan and Rakhi Sawant Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे ती वेगवगेळ्या पद्धतीने प्रदर्शन करत आहे. हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होत आहे. दरम्यान, सारा अली खान, राखी सावंतसोबत ड्रामा क्वीन करताना दिसली आहे.

सारा अली खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत राखी सावंतही दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांनी जवळपास सारखाच ड्रेस परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की जेव्हा दोघेही एकेमेकींना सारख्याच ड्रेसमध्ये पाहून ओरडू लागतात.

दोघेही लाल रंगाच्या सुंदर आऊटफिटमध्ये दिसत आहेत. मग या ड्रेसमध्ये कोण जास्त सुंदर दिसते यावर दोघींमध्ये वाद सुरू होतो. राखी स्वतःला रेड हॉट चिली म्हणते. दोघांमधील संवाद खूपच गंमतीशीर आहे. मग सारा राखीला सांगते की तिला पाप केल्यासारखे वाटेल. मग दोघी जरा हटके जरा बचके या चित्रपटातील 'बेबी तुझे पाप लगा' या गाण्यावर नाचू लागतात.

दरम्यान, राखीने साराला उचलून घेतले आहे. व्हिडिओच्या शेवटी सारा त्याच्या पडता पडता थोडक्यता वाचल्याचे दिसत आहे. या दोघींचा हा व्हिडिओ बाथरूममधील आहे. आयफा अवॉर्डसाठी त्यांनी हे लूक केले होते. व्हिडिओ शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, "रेड हॉट चिली, जेव्हा सौम्या राखीजीला भेटली."

जरा हटके जरा बचके मध्ये सारा सौम्या नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्या विरुद्ध विकी कौशल आहे. विकी आणि सारा ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे.

या चित्रपटातून गाणीही प्रदर्शित झाली आहेत, जी चाहत्यांना आवडली आहेत. नुकतेच दोघांनी अबुधाबी येथे आयोजित आयफा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हा सारा-विकी एकत्र दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कामात कौतुकाची थाप मिळेल, 5 राशींच्या व्यक्तींना मिळणार नवी संधी

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT