Bollywood Diwali Party: ananya pandey sara ali khan janhvi kapoor Instagram @saraalikhan95
मनोरंजन बातम्या

Bollywood Diwali Party: दिवाळी पार्टीतील सारा-जान्हवी आणि अनन्याचे इनसाईड फोटो, पाहा

सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bollywood Diwali Party: बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीची प्रथा खूप जुनी आहे. अमिताभ बच्चनपासून ते करण जोहरपर्यंत अनेक स्टार्स आपल्या मित्रांसाठी दिवाळी पार्टी आयोजित करतात. या पार्ट्यांमध्ये सेलेब्स त्यांच्या डिझायनर ड्रेस आणि सुंदर मेकअपने त्यांचा लूक फ्लॉन्ट करताना दिसतात.

निर्माते अमृतपाल बिंद्रा यांच्या घरीही दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. दरम्यान साराने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीची भेट दिली आहे. (Social Media)

साराने प्री दिवाळी पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारासह अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर देखील दिसत आहेत. फोटोंमध्ये सारा अली खान, अनन्या आणि जान्हवी या एथनिक ड्रेसमध्ये दिसत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट करून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर यूजरने तिघींच्या लूकचे कौतुक होत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "सारा जी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा." तर दुसऱ्या युजरने लिहिले की, "तू खूप सुंदर दिसत आहेस." (Diwali)

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, सारा अली खानने बेज-लाल रंगाच्या लेहेंगा घातला आहे. तर अनन्या लाल रंगाची साडी तर जान्हवी सिल्व्हर रंगाची साडी नेसली आहे. फोटोमध्ये तिन्ही अभिनेत्री एकत्र पोज देताना दिसत आहेत. (Actress)

साराने भाऊ इब्राहिम अली खान, अभिनेता वरुण धवन आणि चित्रपट निर्माता करण जोहरसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, "तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना खूप प्रेम आणि समृद्धीच्या मिळो ही सदिच्छा."

गेल्या आठवड्यापासून, शिल्पा शेट्टी, एकता कपूर, मनीष मल्होत्रा, क्रिती सेनॉन, रमेश तौरानी, ​​आनंद पंडित आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी दिवाळी पार्टी आयोजित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT