Sara Ali Khan Visit Ujjain Mahakal Temple  Twitter
मनोरंजन बातम्या

Sara Ali Khan Visit Ujjain Mahakal Temple: डोक्यावर ओढणी, कपाळी भस्म; सारा अली खान महाकालच्या भक्तीत तल्लीन...

Sara Ali Khan At Mahakal Temple: नुकतंच सारा आणि विकीने आयपीएलच्या फायनलमध्ये चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हजेरी लावली होती. त्यानंतर साराने आज सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट देत आरती केली.

Chetan Bodke

Sara Ali Khan At Mahakal: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल सध्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही जोडी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त भारत दौरा करत आहे. नुकतंच या जोडीने आयपीएलच्या फायनलमध्ये चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त हजेरी लावली होती. आता त्यानंतर साराने आज सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट देत आरती केली. सध्या तिचा दर्शनाला गेलेले अनेक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

सारा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महाकाल मंदिरात हात जोडून डोक्यावर ओढणी घेऊन भक्तीत तल्लीन झालेली दिसली. यावेळी पुजारीही तिला काही तरी समजावताना दिसत आहेत. साराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या डोक्यावर भस्म लावलेला दिसत असून ती देवाच्या भक्तीत तल्लीन दिसत आहे.

यापुर्वी सारा आणि विकी लखनौला प्रमोशननिमित्त पोहोचले होते, त्यावेळी त्यांनी बडे मंगलवरील हनुमान सेतू मंदिराला भेट दिली होती. मात्र, साराच्या मंदिरात जाण्यावर काही लोकांनी आक्षेप घेत तिला मंदिरात जाण्याची परवानगी कोणी दिली? असं म्हणत कमालीचे ट्रोल केले. (Bollywood Film)

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. संगीत सचिन-जिगर यांचे आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. लग्नाआधी दोघांमध्ये खूप प्रेम होते, पण लग्नानंतर सर्व काही बदलते. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते, पण दोघेही खरोखर घटस्फोट घेणार की कथेत आणखी काही ट्विस्ट येणार हे आपल्याला येत्या 2 जूनलाच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT