Sara Ali Khan Instagram@SaraAliKhan
मनोरंजन बातम्या

सारा अली खान 'या' अभिनेत्याला डेट करू इच्छिते; करणच्या शोमध्ये केला खूलासा

या एपिसोडचा ट्रेलर करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जान्हवी आणि सारासोबत मस्ती करताना दिसत आहे.

Shivani Tichkule

मुंबई - करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करण सीझन 7 हा शो नुकताच सुरु झाला आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. आता या आठवड्यात बॉलिवूडच्या दोन मोठ्या अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan)आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) करणच्या शोमध्ये दिसणार आहेत. या एपिसोडचा ट्रेलर करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जान्हवी आणि सारासोबत मस्ती करताना दिसत आहे.

ट्रेलरमध्ये, करण जोहर सारा अली खानला एका मुलाचे नाव सांगण्यास सांगतो ज्याला तिला सध्या डेट करायचे आहे. सुरुवातीला ती सर्व उत्तरे देण्यास नकार देते मात्र नंतर ती विजय देवराकोंडा यांचे नाव घेते. सारा विजयचे नाव घेते तेव्हा जान्हवी हसायला लागते. त्यानंतर करणने जान्हवीला बोलतो अनेकदा विजयसोबत स्पॉट केले जाते. त्यावर सारा जान्हवी विचारते की तिला विजय आवडतो का?

हे देखील पाहा -

साराने तिच्या एक्सबद्दल सांगितले

करणने साराला त्याच्या एक्सबद्दल काहीतरी सांगण्यास सांगितले. यावर सारा म्हणते तो प्रत्येकाचा एक्स असतो. करणने अलीकडेच सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

कॉफी विथ करणचा हा भाग १४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या एपिसोडमध्ये सारा आणि जान्हवीने अनेक खुलासे करताना दिसणार आहेत.

'कॉफी विथ करण' सीझन 7 मध्ये दिसणार हे स्टार्स

'कॉफी विथ करण' सीझन 7 ची सुरुवात रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत झाली. करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी आणि रानी की प्रेम कहानी' या आगामी चित्रपटासाठी 'गली बॉय' जोडी पुन्हा एकत्र आली आहे. आगामी एपिसोड्समध्ये अक्षय कुमार, वरुण धवन, अनिल कपूर, समंथा रुथ प्रभू, सारा अली खान, जान्हवी कपूर, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, क्रिती सेनन यांसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT