36 Gunn Movie  Instagram @ santoshjuvekar12
मनोरंजन बातम्या

36 Gunn : 'लग्न करताय! असायला पाहिजेत हे गुण' सांगणाऱ्या संतोष जुवेकरच्या'३६ गुण' चित्रपटाचे पोस्टर आऊट

संतोष जुवेकरच्या आगमी '३६ गुण' ह्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: अभिनेता संतोष जुवेकर ( Santosh Juvekar)मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाने त्याने अनेक मालिका आणि चित्रपटात अधिराज्य गाजवलं आहे. मोरया चित्रपटातून त्याने खास लोकप्रियता मिळवली. सोशल मीडियावर संतोष जुवेकर कायमच सक्रिय असतो. आता देखील त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ती सध्या चर्चेत असताना नुकताच संतोषच्या आगमी '३६ गुण' ह्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. चित्रपटाच्या शीर्षकाने चित्रपटाविषयीची चाहत्याची उत्सुकता वाढवली आहे.

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने आगामी ३६ गुण या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. ३६ गुणांवर भाष्य करणारा ३६ गुण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. या सिनेमाचं शूटिंग मुंबई आणि लंडनमध्ये पार पडलं आहे. आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय '36 गुण' या सिनेमात मांडण्यात आला आहे. चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार मुख्य भूमिकेत आहे.

'3६ गुण' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा समित कक्कडने सांभाळली आहे. चित्रपटात संतोष जुवेकरसह पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. '३६ गुण' हा सिनेमा येत्या ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT