Sankarshan Karhade Post Instagram @sankarshankarhade
मनोरंजन बातम्या

Sankarshan Karhade Post: 'मी सध्या हवेत आहे...' अभिनेता संकर्षण कऱ्हाडे शेअर केला विमानातला अनुभव

Marathi Actor: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच त्याच्या कविता आणि पोस्टनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो.

Pooja Dange

Sankarshan Karhade Share His Experience:

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच त्याच्या कविता आणि पोस्टनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो. संकर्षण मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत आहे. या सगळ्यात तो विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचान देखील करत असतो.

संकर्षण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याचे अनुभव, त्याच काम, प्रेक्षांच्या प्रतिक्रिया शेअर करत असतो. सध्या संकर्षण नाटकासाठी अमेरिकेला गेला आहे. त्याने तिथे आलेला त्याचा अनुभव शेअर केला आहे.

संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमध्ये काय म्हटलं?

'“माझा हा अनुभव वेळ असेल तर; नक्की वाचा ..” ❤️🤗कॅनसास सिटीहून क्लिव्हलॅंडला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती..

विमान उडत कसं, कसं चालवतात, याच्याविषयी मनात कायम प्रश्नं पडलेले असतात म्हणुन दरवेळी मी विमानात बसताना कुतूहलाने केबीनकडे बघतोच.. आजही तेच केलं..

तर; हे “पायलट साहेब” (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे ढाकळे वाटले…. माझ्याकडे बघुन, स्वत:हून हसले...

आपल्याला “उडवून नेणारा पायलट” आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हणल्यावर हेच मोफत स्माईल दूपटीने परत करायला कसला भाव खायचा ..? म्हणुन मी त्यांच्यापेक्षा जास्त मोकळा ढाकळा हसलो.. आणि त्याच्या केबीनकडे

“काय भाऊ; येऊ का घरांत….??” च्या नजरेनेच पाहिलं.. त्यालाही ते कळलंच...

त्याने मग स्वत:हून “Welcome to my working area” असं म्हणाल्यावर मी फार फार खुष झालो गड्या.. (Sankarshan Karhade)

पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला.. जिथुन २००/३००/४०० लोकांना घेऊन ही विमानं उडत असतात…. खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची, माॅनिटर, टेक ऑफ लॅंडिंगची ती दांडी .. मज्जा वाटली पाहाताना.. मला झालेला एकंदरीत आनंद पाहाता तो परत स्वतःहून म्हणाला; “सिट देअर अँड क्लिक अ पिक्चर” …. मी पाहातच राहिलो .. मला प्रश्न पडला की, हा माझ्या चेहरऱ्यावरचा अती आनंद पाहून मनात मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का ..??

मग मी जरा कंट्रोल्ड वागायची अॅक्टींग करत “No no .. Its ok….” वगैरे म्हणालो तर “कॅप्टन पिटर रसल भाऊंनी” आग्रहाने पायलट सिटवर बसवलं….. आणि माझा फोटो घेतला .. आर काय आनंद झाला म्हणुन सांगू ….?? मग प्रथेप्रमाणे ”Can I click a Picture with you” असं वाक्यं कुणीतरी एकजण म्हणतंच .. ते मी म्हणालो आणि पिटर भाऊंसोबत फोटो काढला ..

थोड्या गप्पा झाल्या, नंबर एक्सेंज झाले… अजुन जरावेळ एकत्रं घालवला असता तर; तो तरी म्हणाला असता की, “विमान चालवतोस का ..? किंवा मी तरी म्हणालो असतो “हो बाजूला मीच चालवतो….” पण त्याच्या आतच संभाषण थांबलं आणि मी माझ्या सिटवर येऊन बसलो आणि पूर्ण प्रवासभर “आता तो हे बटन दाबत असेल …. आता तो स्पिकरवर बोलत असेल” असा विचार करत आनंदात बसुन राहिलो ….

लोकंहो विचार करा …. जरा स्माईल दिलं, प्रेमानं बोललं की, मनात असलं ते सगळं होतंय…. आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं “हवेत आहे"'

संकर्षण कऱ्हाडे त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला अमेरिकेत गेला आहे. तसेच 'संकर्षण वाया स्पृहा' हा कार्यक्रम देखील सुरू आहे. 'तीन अडकून सीताराम' हा त्याच्या चित्रपट देखील २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT