संगीता बिजलानी Instagram
मनोरंजन बातम्या

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचे फोटो पाहून 'सोळावं वरीस धोक्याचं' ही ओळ विसराल!

संगीता बिजलानी एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्याचे त्या काळी लाखो लोक दिवाने होते. तथापि, अद्याप तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) एकेकाळी बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्याचे त्या काळी लाखो लोक दिवाने होते. तथापि, अद्याप तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. वयाच्या 60 व्या वर्षीही संगीता बिजलानीने स्वत: ला ज्या पद्धतीने सांभाळले आहे ते कौतुकास्पद आहे. संगीता सोशल मीडियावर (Social Media) खूप अ‍ॅक्टिव आहे. दररोज तिच्या अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचा नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. जो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

संगीता बिजलानीचा जो लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहे, त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. या फोेटोत तिने डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातली असून डोळ्याला गॉगल लावला आहे. संगीताचे खुले केस आर्कषण ठरत आहेत. अभिनेत्रीचा हा फोटो लोकांना खूपच आवडला असून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत. फोटोवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिले की, 'मॅडम, तुमच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे?' तर तिथे दुसर्‍याने लिहिले, 'पुन्हा एकदा तुम्ही सुंदर दिसत आहात'.

संगिताच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना तिने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले, ज्यातून 2010 मध्ये तिचा घटस्फोट झाला. एक काळ असा होता की संगीता सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. चित्रपटाच्या कारकीर्दीबद्दल सांगायचे तर संगीता त्रिदेव, हाथिम ताई, योद्धा या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT