Mawra Hocane SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mawra Hocane : बॉलिवूड अभिनेत्री झाली पाकिस्तानची सून; सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे फोटो केले शेअर

Mawra Hocane- Ameer Gilani Wedding : 'सनम तेरी कसम' स्टार मावरा होकानेने पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहा.

Shreya Maskar

सध्या अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. हा फेब्रुवारी महिना देखील प्रेमाचे प्रतीक मानला जात आहे. अशात आता बॉलिवूडची अभिनेत्री मावरा होकाने (Mawra Hocane) लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री मावरा होकानेला 'सनम तेरी कसम' या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने पाकिस्तानी अभिनेता अमीर गिलानीसोबत ( Ameer Gilani) लग्न केले आहे. त्याच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मावराच्या लग्नानेमुळे तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. तिच्या लग्नाच्या फोटोंवर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. मावरा होकाने आणि अमीर गिलानी यांनी 'सबत' आणि 'नीम' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. या मालिकांमधील त्यांची ऑनस्क्रीन भूमिका चाहत्यांना खूप आवडली. अनेक वेळा मावरा आणि अमीर एकत्र स्पॉट झाले होते. तेव्हा पासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि आता अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत.

लग्नासाठी दोघांनीही पारंपरिक लग्नाचा लूक केला होता. मावराने हलक्या हिरव्या आणि चंदेरी रंगाची लेहेंगा चोली परिधान केलेली होती. तर संपूर्ण लेहेंग्यावर सुंदर बहुरंगी वर्क होते. डोक्यावर सुरेख काम असलेली चुनरीवर घेतली होती. आपल्या लूकला मॅचिंग मावराने ज्वेलरी परिधान केली होती. तिने मांग टिक्का, नेकलेस आणि कानातले घालून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

लग्नात अमीरने काळ्या रंगाची सुंदर शेरवानी परिधान केली होती. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत. मावराने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याला तिने एक हटके कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं की, "आयुष्याच्या या धावपळीत, अखेर मी तुला शोधले आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT