Samay Raina India’s Got Latent Google
मनोरंजन बातम्या

India’s Got Latent: रणवीर अलाबादियासह अपूर्वा मखीजाही वादाच्या भोवऱ्यात; चाहते संतप्त, अडचणीत वाढ!

Samay Raina India’s Got Latent: 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये आक्षेपार्ह, महिलाद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

India’s Got Latent: इंडियाज गॉट लेटेंट (IGL) हा शो सध्या वादाचा विषय बनला आहे. कॉमेडी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शोचे रूपांतर आता अपमानास्पद, आक्षेपार्ह आणि महिलांबद्दलच्या द्वेषपूर्ण कंटेंटसाठी एका व्यासपीठामध्ये झाले आहे. यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

समय रैनाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात रणवीर अलाबादिया आणि अपूर्वा मखीजावरून नवीन वाद तयार झाला आहे. या शोवरील धक्कादायक टिप्पण्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. एका भागात, अलाबादियाने एका स्पर्धकाच्या त्यांच्या पालकांशी असलेल्या लैंगिक संबंधांबद्दल अत्यंत अनुचित टिप्पणी केली - ज्या टिप्पण्या अनेक प्रेक्षकांनी 'अश्लील' आणि 'विकृत' म्हणून संबोधल्या आहेत.

त्याच भागात, तुझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये संवेदना नाहीत का, अशी टिप्पणी एक स्पर्धकाने अपूर्वाला केली. अशा आक्षेपार्ह संभाषणं सर्वांसाठी युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि यामुळे संपूर्ण समाजाला त्रास होतो. सर्वात वाईट म्हणजे, या शोमध्ये आक्षेपार्ह कंटेंट असूनही, त्याला मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळाले आहेत.

यूट्यूबर्स आणि शो आयोजकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे, यामध्ये त्यांच्यावर हानिकारक आणि नकारात्मक वक्तव्यानं प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत अशी कंटेंट आणखी पसरू नये म्हणून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीच्या आवाहनात सामील होऊन या टिप्पण्या 'पूर्णपणे चुकीच्या' असल्याचे म्हटले आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ इतरांचा अनादर करण्याचे स्वातंत्र्य नाही यावर भर दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT