मनोरंजन बातम्या

IBD 3 Winner: चतुर मिनिस्टर समर्पण लांबा झाला 'India's Best Dancer 3'चा विजेता

India's Best Dancer Season 3:

Pooja Dange

'इंडियाज बेस्ट डान्सर ३'चा ग्रँड फिनाले ३० सप्टेंबर २०२३ ला पार पडला. या डान्स शोमधील सर्वच स्पर्धक दमदार होते. सोनाली बेंद्रे, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांनी या पर्वाचे परीक्षण केले. 'इंडियाज बेस्ट डान्सर ३' ग्रँड फिनालेला सुपरस्टार गोविंदा, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांनी हजेरी लावली होती.

अनिकेत चौहान, अंजली मंगाय, शिवांशु सोनी, समर्पण लांबा आणि विकल्प खांडपाल हे 'इंडियाज बेस्ट डान्सर ३'चे टॉप ५ फायललिस्ट होते. पाचही स्पर्धकांनी ग्रँड फिनालेच्या दिवशीही जबरदस्त सादरीकरण केले.

विपुल खंडपाल पाचवा क्रमांक, अनिकेत चौहान चौथा क्रमांक, शिवांशू सोनी तिसऱ्या क्रमांकावर होते. तर अंजली मंगाई आणि समर्पण लांबा टॉप टू स्पर्धक ठरले. या दोघांमध्ये बाजी मारली ती पुण्याच्या समर्पण लांबाने.

'इंडियाज बेस्ट डान्सर ३' ग्रँड फिनाले खरंच ग्रँड होता. इंडियन आयडल सीजन १०, १२ चे विजेते सलीम अली आणि पवनदीप यांनी देखील त्यांच्या दमदार आवाजाने फिनालेला चार चाँद लावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Care : आयब्रोचे केस कमी झालेत? जाड आयब्रोसाठी फॉलो करा ही सोपी केअर रुटीन

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT