Sam Bahadur Twitter Review Instagram
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur Twitter Review: विकी कौशलची दमदार ॲक्टिंग अन् मेघना गुलजारचं कॅमेऱ्यामागची जादू; 'सॅम बहादुर'ची सोशल मीडियावर हवा

Sam Bahadur Film: मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी ट्वीटरच्या माध्यमातून चित्रपट कसा वाटला याविषयीची पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Sam Bahadur Twitter Review

आज बॉक्स ऑफिसवर मेघना गुलजार (Meghana Guljar) दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur) रिलीज झाला आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटामध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांचे पात्र अभिनेता विकी कौशलने साकारले आहे.

१९७१ मध्ये भारत- पाकिस्तान युद्धामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटामध्ये विकी कौशल सह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी सारखे प्रतिभावान कलाकार चित्रपटामध्ये दिसत आहेत. चित्रपट अनेक युजर्सने पाहिला आहे. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला ‘सॅम बहादुर’प्रेक्षकांना फारच आवडला आहे. रोहित जयस्वाल या सोशल मीडिया इन्फ्लूएंसरने चित्रपट पाहिला. ‘साहसी आणि धाडसी... मेघना गुलजार दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘सॅम बहादुर’ चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. विकी कौशलचा हा खूपच सुंदर चित्रपट आहे. जो खऱ्या भारतीयांना आपल्या भारतीय सैन्याचा अभिमान वाटणारा चित्रपट आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा ही खूप मोठी व्यक्ती आहे. या व्यक्तीचा चित्रपट बनवण्यासाठी बराच काळ लागला. खूपच सुंदर सिनेमा, आवश्य थिएटरमध्ये जाऊन पाहावा असा चित्रपट...’ पाच पैकी चार स्टार ह्या युजरने दिले आहे. (Bollywood Film)

तर आणखी एका युजरने चित्रपटाविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. खूप सुंदर प्रतिसाद... या चित्रपटाला नक्कीच नॅशनल अवॉर्ड... इतर चित्रपटांपेक्षा हा चित्रपट फार वेगळा... तर आणखी एक युजर म्हणतो, खूप सुंदर चित्रपट, सुंदर कथा, सर्वच कलाकारांच्या अभिनयाला अफलातून प्रतिसाद... (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT