Salman Khan Not Hosting Bigg Boss OTT 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update : सलमान खानचा बिग बॉसमधून ब्रेक! 'वीकेंड का वार'मध्ये कोण घेणार स्पर्धकांची शाळा ? जाणून घ्या

Salman Khan Not Hosting BB OTT 2 : सलमान खानला या आठवड्यात 'बिग बॉस ओटीटी 2' वीकेंड का वारसाठी उपस्थित राहता येणार नाही.

Pooja Dange

Krushna Abhishek Replaced Salman Khan : 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या शोचे दोन आठवडे वाढवण्यात आला आहेत, तर आता या आठवड्यात दोन नवीन सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. एल्विश यादव आणि आशिका भाटिया.

एल्विसने घरात प्रवेश केल्यापासून घरातील सदस्यांचा बॅण्ड वाजवून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या आठवड्यात त्याचा पहिला वीकेंड का वार आहे, पण त्याला होस्ट सलमान खानचा सामना करावा लागणार नाही!

सलमान वीकेंड का वार होस्ट करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची जागा कॉमेडियन कृष्णा अभिषेक घेणार आहे. (Latest ENtertainment News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूर्वीच्या वचनबद्धतेमुळे, सलमान खानला या आठवड्यात 'बिग बॉस ओटीटी 2' वीकेंड का वारसाठी उपस्थित राहता येणार नाही. त्याच्या जागी कृष्णा अभिषेक अ‍ॅक्टिव्हिटी एरियात जाऊन त्याच्या स्टाइलमध्ये शो होस्ट करणार असल्याचे बोलले जात आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये दोन नवीन सदस्य आले आहेत. एक म्हणजे एल्विश यादव, तो यूट्यूबर आहे आणि शॉर्ट फिल्म देखील बनवतो. 25 वर्षीय एल्विश मूळचा गुरुग्रामचा असून सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध नाव आहे. दुसरी आशिका भाटिया आहे, टीव्ही-बॉलिवूड अभिनेत्री आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

नुकत्याच झालेल्या एपिसोडबद्दल बोलायचे झाले तर पूजा भट आणि जिया शंकर यांच्यात जोरदार भांडण झाले होते. पूजाने संपूर्ण कुटुंबासमोर जियाचे पितळ उघडे पडले आहे. दुसरीकडे, जिया देखील गप्प बसली नाही, तिने पूजाला 'डबल फेस' म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT