Tiger 3 Video Leaked Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Video Leaked: सलमान खानच्या 'टायगर ३' चित्रपटातील गाणं लीक; कतरिनाचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Katrina Kaif Video: व्हायरल व्हिडिओमध्ये कतरिना बॅकग्राउंड डान्सर्ससोबत गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहे.

Pooja Dange

Katrina Kaif Dance Viral:

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 21 एप्रिल 2023 रोजी रिलीज झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटानंतर हा सलमानचा यावर्षी रिलीज होणार दुसरा चित्रपट ठरेल.

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण चाहत्यांच्या अपेक्षाभंग झाला. आता सलमानचे चाहते 'टायगर 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत बी-टाऊनची हॉट आणि सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार आहे.

'टायगर 3' चा व्हिडीओ लीक

या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या चित्रपटाचं एक व्हिडीओ लीक झाला आहे. लीक झालेल्या या व्हिडिओमध्ये कतरिना बॅकग्राउंड डान्सर्ससोबत गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहे. गाण्याचे बीट्स 'एक था टायगर' मधील 'माशाअल्लाह' या प्रसिद्ध गाण्यासारखे आहेत. इंटरनेटवर व्हिडिओ लीक होताच युजर्सनी या चित्रपटाविषयी अंदाज बांधायला सुरुवात केली.

'पुन्हा माशाल्लाह'

नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. एक नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, मला वाटलं हे माशाल्लाह गाणे आहे. मी विसरलो होतो की टायगर 3 चित्रपट प्रदर्शित होऊन काही वर्ष झाली आहेत. त्यांनी माशाल्लाहची रिक्रिएट केला आहे." असे दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे.

टायगर 3' दिवाळीला होणार प्रदर्शित

'टायगर 3' हा सलमानचा तिसरा स्पाय थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफशिवाय अभिनेता इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'टायगर 3' दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान वर्कफ्रंट

सलमान खान 'बिग बॉस ओटीटी २' होस्ट करत होता. नुकताच हा शो संपला आहे. तर सलमान खानचा आगामी चित्रपटातील लूक व्हायरल होत आहे. तर 'पठान'मध्ये त्याने कॅमिओ केला होता.सलमान खान 'बिग बॉस ओटीटी २' होस्ट करत होता. नुकताच हा शो संपला आहे. तर सलमान खानचा आगामी चित्रपटातील लूक व्हायरल होत आहे. तर 'पठान'मध्ये त्याने कॅमिओ केला होता. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

Mumbai ganeshotsav: देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा, 474 कोटींचा गणपती

Mumbai Rain: मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

SCROLL FOR NEXT