Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan new Song Teaser Twitter
मनोरंजन बातम्या

Salama Khan's New Song: 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील सलमानचा नवीन अंदाज; 'येंतम्मा' गाण्याचा टीझर प्रदर्शित

Yentamma Song From Kisi Ka Bhai Kisi Ki Jann: 'किसी का भाई किसी की जान' मधील 'येंटम्मा' हे गाणे हिंदी-तेलुगू फ्युजन आहे.

Pooja Dange

Salman Khan Revel Yentamma Teaser: सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणी एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. किसी का भाई किसी की जान चित्रपटातील 'यंतम्मा' या आणखी एका गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

या टीझरमध्ये सलमान खान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. याआधी चित्रपटातील रोमँटिक गाणे 'नईयो लगदा' आणि पंजाबी गाणे 'बिल्ली कॅट' लोकांना आवडले होते.

नुकतेच 'बथुकम्मा' जे गाणे प्रदर्शित झाले, जे लोकांना खूप आवडले. तेलंगणातील संस्कृतीचे दर्शन या गाण्यातून घडत आहे. 'किसी का भाई किसी की जान' मधील 'येंटम्मा' हे गाणे हिंदी-तेलुगू फ्युजन आहे.

आज सलमान आणि त्याच्या टीमने यंतम्माचा टीझर प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये सलमान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये दिसत आहेत. टीझरमधील सीन भारताच्या दक्षिणेकडील समृद्ध संस्कृतीच्या रंगांनी भरलेली आहेत आणि त्यात सलमान खानची भर आहे.

किसी का भाई किसी कि जान चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांचे मनोरंजन नक्की करेल. हे गाणे पायल देव यांनी संगीतबद्ध केले आहे. हे विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे आणि रफ्तारने रॅप केले आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांचे असून नृत्य दिग्दर्शन जानी मास्टर यांचे आहे.

या गाण्याच्या शेवटच्या टीझरमध्ये एक मिस्ट्री मॅन, सलमान आणि व्यंकटेशला डान्स फ्लोअरवर सामील होताना दाखवण्यात आले आहे आणि त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की हा मिस्ट्री मॅन राम चरण आहे का? हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Satara Fire : धाड धाड धाड...! साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

SCROLL FOR NEXT