Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Helath Issues: सलमान खानला झाला 'हा' गंभीर आजार; स्वत:चं खुलासा करत म्हणाला, तरीही मी काम करत...

Salman Khan Helath: सलमान खानने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावल्यानंतर त्याच्या गंभीर आरोग्य समस्यांबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan Helath Issues: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आरोग्यविषयक खुलाशामुळे चर्चेत आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात उपस्थित असताना सलमानने पहिल्यांदाच अत्यंत गंभीर आरोग्य समस्यांची माहिती दिली. यामध्ये ट्रायजेमिनल न्युराल्जिया, ब्रेन अ‍ॅन्युरिझम आणि AV मलफॉर्मेशन या तीन गंभीर आजारांचा समावेश आहे.

कार्यक्रमादरम्यान कपिल शर्माने त्याच्या आरोग्याबाबत विचारले असता सलमान म्हणाला, “माझं एक हाडं तुटलं आहे, मी ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचा सामना करत आहोत, मेंदूमध्ये एन्युरिझम आहे आणि त्याचे उपचार चालू आहेत, एव्ही मलफॉर्मेशन आहे, त्याचे उपचार चालू आहेत. तरीही मी काम करत आहे.’

ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा एक न्युरो-आजार असून यामध्ये चेहऱ्यावर अत्यंत वेदना होतात. याला 'सुसाइड डिसीज' असंही म्हटलं जातं कारण यात असह्य वेदना होतात. ब्रेन अ‍ॅन्युरिझम ही अशी स्थिती असते जिथे मेंदूतील रक्तवाहिनीत गाठ निर्माण होते, जी फुटल्यास प्राणघातक ठरू शकते. AV मलफॉर्मेशन ही मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील दोषात्मक रचना आहे जी रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करू शकते.

सलमान याआधीही आपल्या आरोग्याबद्दल फार कमी वेळा बोलला आहे. मात्र या कार्यक्रमात त्याने अत्यंत प्रामाणिकपणे आपली व्यथा शेअर केली. याच मुलाखतीत त्याने लग्नावरूनही मजेशीर टिप्पणी केली की, “लग्न केल्यास अर्धी संपत्ती जाते, म्हणून लग्नच टाळलं.”

सलमान खानच्या कामाच्या बाबतीत

सलमान खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, सलमान शेवटचा 'सिकंदर' चित्रपटात दिसला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी केली नाही. या चित्रपटात अभिनेतासोबत रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT