Bigg Boss  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: सलमान खानने घेतला 'बिग बॉस'मधून ब्रेक, 'हे' आहे त्याचे कारण

'बिग बॉस हिंदी'चा होस्ट अभिनेता सलमान खानने थांबवले आहे त्याचे शूटिंग.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss 16: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान 'बिग बॉस'चा एकमेव होस्ट आहे. त्याच्याशिवाय 'बिग बॉस कोणी होस्ट करू शकत नाही असे अनेकांचे मत आहे. पण आता सलमान खानची जागा करण जोहरने घेतली आहे. गेले काही दिवस करण जोहर 'बिग बॉस 16' होस्ट करत आहे. सलमान खान होस्ट का करत नाही किंवा तो कुठे गेला असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.

सलमान खान या वर्षी बॉलिवूडच्या अनेक दिवाळी सेलिब्रेशनमध्येही दिसला नव्हता. या आठवड्याच्या 'बिग बॉस 16'च्या शनिवार व रविवारच्या विशेष भागाच्या शुक्रवारच्या वीकेंड का वारमध्येही सलमान नव्हता. तेव्हा सलमानला डेंग्यू झाला असल्याचे कळले. 'किसी का भाई किसी की जान 'या चित्रपटाचे तो शूटिंग करत होता. सध्या त्याने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे आणि तो आराम करत आहे.

सलमान खानच्या अनुपस्थितीत 'बिग बॉस OTT'चा होस्ट करण जोहानने 'बिग बॉस 16'च्या वीकेंड स्पेशल एपिसोडचा ताबा घेतला होता. सलमानच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, तो आता बरा होत आहे आणि लवकरच शूटिंगला सुरूवात करणार आहे. (Bigg Boss)

एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, सलमानची काही कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे त्याने 'बिग बॉस 16'साठी शूट केले नाही. "सलमान शनिवारी शूट करेल आणि त्याच रात्री त्याचा एपिसोड प्रसारित होईल. त्याचा काही भाग रविवारी शेखर सुमनच्या विशेष सेगमेंटसह प्रसारित होईल."

सलमान खान 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवीसोबत खास भूमिकेत दिसला होता. सलमान खानने सांगितले आहे की, कतरिना कैफसोबतचा त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट 2023च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान एक खास कॅमिओ करताना दिसणार आहे. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' 2023 ला ईद दरम्यान प्रदर्शित होणार आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

SCROLL FOR NEXT