salim khan and salman khan Google
मनोरंजन बातम्या

Salman Khan : 'तो त्याच्या आईला शोधण्याचा...'; सलमान खानच्या लग्नावर सलीम खान यांचा मोठा खुलासा

Salim Khan On Salman Khan Wedding : सलमान खान 59 वर्षांचा झाला असला तरी तो अजूनही बॅचलर आहे. जरी तो अनेक सुंदरींच्या प्रेमात पडला असला तरी त्याने लग्न केले नाही. सलीम खान यांनी मुलगा सलमान लग्न न करण्याचे खरे कारण सांगितले.

Shruti Kadam

Salman Khan : सलमान खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. पण सलमानच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याची लव्ह लाईफ जास्त चर्चेत आहे. सलमान खानचे नाव अनेक सौंदर्यवतींसोबत जोडले गेले असले तरी त्याने अद्याप लग्न केलेले नाही. काही काळापूर्वी वडील सलीम खान यांनी सलमान खानने लग्न का केले नाही हे सांगितले होते.

एका मुलाखतीत सलीम खान म्हणाले, 'सलमान काय आहे हे मला माहीत नाही. त्याच्या विचारात विरोधाभास असल्याने सलमानचे लग्न होत नाही. सलमान ज्या व्यक्तीसोबत काम करतो त्याच्याकडे तो आकर्षित होतो. काम करताना एकमेकांच्या जवळ राहायला मिळत त्यामुळे सततचा सहवास असल्यामुळे९० टक्के चित्रपटाच्या नायिकांच्या प्रेमात तो पडतो.

सलीम खान यांनी सांगितले की, जेव्हा सलमान एखाद्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये येतो तेव्हा तो तिच्यामध्ये आईचे गुण शोधण्याचा प्रयत्न करतो. सलीम खान म्हणाले की, सलमान करिअर-ओरिएंटेड महिलेने आपल्या महत्त्वाकांक्षा सोडून केवळ घरातील कामांवर लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा करतो हे चुकीचे आहे. त्याच्याव्यक्तीसोबत लग्न करून तिला घरी सेटल करेन योग्य नाही म्हणून त्याचे लग्न होत नाही.

ते पुढे म्हणाले, 'जेव्हा तो एखाद्या मुलीला कमिटमेंट देतो, तेव्हा तो तिला बदलण्याचा प्रयत्न करतो, तिच्यात त्याची आई शोधतो. ते शक्य नाही. काम करणा-या अभिनेत्री मुलांना शाळेत घेऊन जाणे, त्यांना त्यांच्या गृहपाठात मदत करणे किंवा त्यांच्यासाठी दुपारचे जेवण तयार करणे यासारखी कामे करू शकत नाही हे त्याला समजले पाहीजे असे पुढे सलिम खान म्हणाले.

या वर्षी ईदला सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT