Salman Khan Smoking News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Smoking News: इतरांना शिकवतो आणि स्वतः सिगारेट ओढतो, भाईजान झाला ट्रोल

Salman Khan Smoking: सोशल मीडियावर Bigg Boss OTT 2 मधील सलमानचा एक धक्काकदायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Salman Khan Smoking Bigg Boss OTT 2 News: सध्या ‘बिग बॉस ओटीटी २’ची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. नुकताच काल ‘शनिवार का वार’ पार पडला. यावेळी सलमानने त्याच्या खास स्टाईलमध्ये स्पर्धकांना चांगलेच खडेबोल सुनावले. सलमानच्या होस्टिंगमुळे शोला सर्वाधिक रेटिंग मिळत असून शो चांगलाच हिट होत आहे.

सोशल मीडियावर Bigg Boss OTT 2 मधील एक धक्काकदायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत, ‘बिग बॉस ओटीटी २’चा होस्ट सलमान खान कॅमेऱ्यासमोर सिगारेट ओढताना दिसत आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’ कार्यक्रमातील स्पर्धकांचा खेळ खूपच इंट्रेस्टिंग होत असून या शोला आता दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे चाहते कमालीचे खुश आहेत. या विकेंड का वारमध्ये सलमान सिगारेट पिताना दिसत असल्याने तो सोशल मीडियावर तुफान ट्रोल होतोय.

सलमान जरी सोशल मीडियावर तुफान चर्चेत जरी आला असला तरी, त्याने शोमधील सर्वच स्पर्धकांची कानउघडणी केली आहे. बिग बॉस हा असा रिॲलीटी शो आहे, या शोमध्ये सर्वच स्पर्धक कॅमेऱ्याच्या गऱ्हाळ्यात असतात. सलमान नेहमीच ‘शनिवार का वार’मध्ये स्पर्धकांची कान उघडणी करत असतो. त्याच दरम्यान त्याच्या आजुबाजुला असणाऱ्या कॅमेऱ्यांपैकी एका कॅमेऱ्यात त्याच्या हातात सिगारेट धरलेली दिसतेय.

यावेळी सलमानला नेटकरी म्हणतात, “आम्हाला माहितीये, तू किती ढोंगी आहेस. पण तू जर समोरच्याला व्याख्यान देत असेल, तर किमान त्यांच्यासमोर तरी चांगलं वाग.” तर आणखी एक नेटकरी सलमानला म्हणतो, “अरे हे OTT आहे, नॅशनल टिव्ही नाही. त्यामुळे मला वाटतं, यामध्ये कोणतीही कायदेशीर समस्या नाही.” तर आणखी एक नेटकरी म्हणतो, “स्पर्धकांना संस्कृती आणि विकृतीबद्दल व्याख्यान देतो आणि स्वतः प्रत्येक चुकीचे काम करतो.”

सलमान खानने गेल्या आठवड्यात वीकेंड का वार एपिसोडमध्ये जेद हदीद आणि आकांक्षा पुरी यांना चांगलेच फटकारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

IAS transfer : राज्यात पुन्हा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची कुठे झाली नियुक्ती

Shraddha Kapoor - Eetha : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाला विरोध; नाव बदलण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Coaching Centre Fire : अग्नितांडव! कोचिंग क्लासला भीषण आग; १५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT