Salman Khan Post Grab netizens attention  Instagram @beingsalmankhan
मनोरंजन बातम्या

Salman Khan Post: सलमान खानसोबतची 'ती' मुलगी कोण?, पोस्टने वेधलं लक्ष

Salman Khan: सलमान खानच्या हृदयात कोण? पोस्ट करत अभिनेत्याने दिली माहिती.

Pooja Dange

Salman Khan Drawing:

अभिनेता सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'टायगर ३'मुळे चर्चेत आहे. सलमान या चित्रपटामध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. सलमान खान सोशल मीडिया खूप सक्रिय आहे. त्याची प्रत्येक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. अशीच इंटरेस्टिंग पोस्ट सलमान खानने केली आहे.

सलमान खानच्या या पोस्टमध्ये सलमान खान व्हाईट कपड्यांमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत एक मुलगी देखील आहे. पण त्या मुलीने कॅमेराकडे पाठ केली आहे. तिने देखील व्हाईट कपडे घातले आहे.

सलमान खानने या पोस्टला खूप सुंदर कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, 'नेहमीच तुझ्या पाठीशी असेन'. तसेच सलमान खान त्याच्या मुलीसोबतचा जो फोटो शेअर केला आहे त्यावर 'माझ्या हृदयातील छोटा तुकडा उद्या शेअर करणार आहे' असे लिहिले आहे. तसेच त्या मुलीच्या व्हाईट जॅकेटवर गोल्डन अंकांत २७ डिसेंबर हे तारीख देखील लिहिली आहे.

सलमान खानच्या या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांनी उत्सुकता वाढली आहे. सलमानच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी विविध तर्क-वितर्क लावत आहेत. 'भाई लग्न करत आहेस का?', 'वहिनी आहेस का?', 'बेस्ट मामा', 'सलमानची सिक्रेट मुलगी', 'ही वहिनी नाही भाची आहे', 'शेहनाज गिल' अशा अनेक कमेंट सलमानच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी या पोस्टवर रेड हार्ड पाऊस पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहेत रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT