Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: 'माझा मोठा भाऊ...'; संजू बाबासाठी रात्री १.४० वाजता सलमान खानने केली प्रेमळ भावूक पोस्ट

Salman Khan: सलमान खानने संजय दत्तसोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली. 'संजू बाबा'साठी प्रेम व्यक्त करत देवाकडे प्रार्थना केली ही पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: बॉलिवूडचे दोन पॉवरफुल अभिनेते सलमान खान आणि संजय दत्त यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त सलमान खान त्याला भेटला होता. त्यानंतर सलमानने सोशल मीडियावर केलेली भावूक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्यरात्री सुमारे १.४० वाजता सलमानने संजय दत्तसोबतचे दोन खास फोटो शेअर करत आपल्या मोठ्या भावाविषयीचे प्रेम आणि आदर व्यक्त केला.

या फोटोंमध्ये सलमान आणि संजय दत्त एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आपुलकी पाहून त्यांची जुनी मैत्री स्पष्टपणे दिसून येते. संजय दत्तचा ६७ वा वाढदिवस २९ जुलै रोजी झाला होता. त्यानंतर ३१ जुलैला सलमान त्याला भेटला.

इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये सलमानने लिहिले, "बाबा, नेहमीच बाबा आणि बाबा म्हणजे बाबाच. संजू बाबा आपल्या सर्वांसाठी 'बाबा' आहेत आणि आता आपल्या मुलांसाठीही बाबा आहेत. माझा मोठा भाऊ संजय दत्त. अल्लाह, ईश्वर आणि येशू या माणसाला नेहमी आनंदी ठेवोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, बाबा." असे म्हटत सलमानने संजय दत्तवरील प्रेम व्यक्त केले.

सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने, "तूही कायम आनंदी राहा. तुला उत्तम आरोग्य आणि यश लाभो," अशा शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या चाहत्याने, "काही मिठी शब्दांत सांगता येत नाहीत. तुमच्या दोघांवर कायम देवाची कृपा राहो," अशी भावना व्यक्त केली. तर आणखी एका चाहत्याने, "बॉलिवूडमध्ये नाती बदलत असतात, पण सलमान आणि संजू बाबांची मैत्री आजही तितकीच मजबूत आहे," अशी प्रतिक्रिया देत दोघांच्या नात्याचे कौतुक केले.

सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री अनेक दशकांपासून कायम आहे. दोघांनी केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर रुपेरी पडद्यावरही अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'साजन', 'चल मेरे भाई' आणि 'ये है जलवा' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या या दोघांच्या मैत्रीचे उदाहरण नेहमीच बॉलिवूडमध्ये दिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे- अजित डोवाल

Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

Beauty Tips : नाकावरील ब्लॅक अन् व्हाइट हेड्स जात नाहीत? 'या' 5 टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT