Salman Khan - Cristiano Ronaldo In One Frame Twitter
मनोरंजन बातम्या

Salman Khan - Cristiano Ronaldo: सलमान खान आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोने एकत्र पाहिली बॉक्सिंग मॅच, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Salman Khan Viral Video: सलमान खान आणि रोनाल्डो यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होता होते.

Pooja Dange

Salman Khan - Cristiano Ronaldo Watching Boxing Match:

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या दोन्ही स्टार्सनी सौदी अरेबिया येथील एका बॉक्सिंग मॅचला हजेरी लावली होती.

टायसन फ्यूरी आणि फ्रांसिस नगनौ यांच्या बॉक्सिंग मॅचचा आनंद घेण्यासाठी सलमान आणि रोनाल्डो सौदीला गेले होते. रोनाल्डोसोबत त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रिग्ज देखील होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सलमान खान आणि रोनाल्डो यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होता होते. यावरून अनेक मीम्स देखील नेटकऱ्यांनी शेअर केले होते. पण काही नेटकरी त्यांच्या आवडत्या स्टार्सना एका फ्रेममध्ये खूप खुश झाले आहेत. स्टार स्टडेड या इव्हेंटचे नेटकऱ्यांनी भरपूर कौतुक केले.

सलमान खान आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये हे स्टार कसे एकमेकांना इग्नोर करत असल्याचे दिसत आहे. बॉक्सिंग मॅच संपल्यानंतर जेव्हा रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत जात होता तेव्हा त्याने त्याच्या समोर उभ्या असलेल्या सलमानकडे पाहिले देखील नाही. (Latest Entertainment News)

सौदी अरेबियातील बॉक्सिंग मॅचमधील आणखी एक व्हिडिओ सलमान खानच्या फॅनने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान खास रोनाल्डोकडे दुर्लक्ष करत आहे हे फॅन कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

काहीजण असे मत व्यक्त करत आहेत की, ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील फुटबॉलपटू आहे. तो सलमान ओळखत नसेल त्यामुळे तो त्याच्याशी संवाद साधला असेल. तर काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या सुरक्षा रक्षकांनी विकी कौशलला अडवले होते. तर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या रक्षकांनी सलमान खानला अडवल्याचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. त्यावरून कर्मा हिट्स बॅक तो सलमान खान असे नेटकरी म्हणत आहे.

सोशल मीडियावर सौदी अरेबियातील या मॅचमधील रोनाल्डो आणि सलमान खान यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो उपलब्ध आहेत. पण या एकही फोटो आणि व्हिडीओमध्ये सलमान खान आणि रोनाल्डो यांचा संवाद किंवा हाय, हॅलो झाल्याचे दिसत नाही. असे असले तरी या दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या स्टार्सना पाहून खूप आनंद झाला आहे.

सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'टायगर ३'च्या तयारीत व्यस्त आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील एक पार्टी सॉंग 'लेके प्रभू का नाम' प्रदर्शित झाले आहे. 'टायगर ३'चा धमाकेदार ट्रेलर देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : राज्यात दुष्काळाचे संकट गडद! शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, सोलापूरसह धाराशिवला तातडीने मदत देण्याची मागणी

Gold Price Today: १० दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे ताजे दर पाहा

Maharashtra News Live Update: राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका, Y+ सुरक्षा हटवली

Best Oil For Frying Puri: सणासुदीला पुऱ्या तळण्यासाठी कोणते तेल वापरावे? हे ५ पर्याय ठरतील आरोग्यासाठी फायदेशीर

Navi Mumbai : नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ४५,००० रुपये बोनस मिळणार, पगारातही मोठी वाढ

SCROLL FOR NEXT