Salman Khan Hosting Bigg Boss 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: बिग बॉस १६ 'या' स्पर्धकाला मिळणार चित्रपटामध्ये काम करण्याची संधी, सलमानने स्वतः जाहीर केले नाव

'वीकेंड का वार'च्या भागात सलमानने प्रियांका चहर चौधरी फेव्हरेट स्पर्धक असल्याचे जाहीर केले.

Pooja Dange

Salman Khan Want To Work With Bigg Boss 16 Contestant: बिग बॉस १६ आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस स्पर्धकांनी अनेक प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तसेच हे स्पर्धक अनेकांचे फेव्हरेट स्पर्धक बनले आहेत. सलमान खान शो होस्ट करतो. त्याने हा शो जवळून बघितला आहे. त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणे त्यांचे सुद्धा घरामध्ये काही फेव्हरेट स्पर्धक आहेत. 'वीकेंड का वार'च्या भागात सलमानने प्रियांका चहर चौधरी फेव्हरेट स्पर्धक असल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर प्रियंकासोबत काम करायचे असल्याचे बोलून दाखविले.

'वीकेंड का वार'मध्ये सलमानने साजिदला एका बोर्डवर त्याच्या आवडीची कास्ट ठरावाला सांगितली. सलमाने साजिदला सांगितले की, बिग बॉसच्या स्पर्धकांना घेऊन चित्रपट बनवायचे ठरवले तर कोणाला कोणता रोलमध्ये कास्ट देण्यात येईल? साजिदने लीड रोलसाठी एमसी स्टॅनला कास्ट केले तर हिरोईनचा लीड रोल सौंदर्य शर्माला दिला. प्रियंकाला सजिदीने उर्वरित कलाकारांच्या यादीत टाकले. हे पाहून सलमाने त्याले थांबले. सलमानने त्याला मध्येच थांबविल्यामुळे साइजदे लगेच कास्टमध्ये बदल केले आणि सौंदर्याचे लीड रोल प्रियंकाला दिला. तर सौंदर्याला उर्वरित कलाकारांमध्ये टाकले.

दरम्यान साजिदने सलमानला विचारले तू कोणत्या स्पर्धकाला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देशील? त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना सलमानने स्पष्टपणे प्रियाचा चहर चौधरीचे नाव घेतले. तसेच सलमान म्हणाला, 'साजिद तुला माहित आहे, मी नेहमीच बिग बॉसच्या प्रत्येक सीजनमधील कोणत्या ना कोणत्या स्पर्धकासोबत काम केले आहे. यावेळी संधी मिळाली आणि शक्य झालं तर प्रियांकासोबत चित्रपट बनविण्याचा विचार करत आहे. मला असे लावते की तिचे भविष्य ब्राईट आहे, तिच्याकडे पोटेन्शिअल आहे. ती टॉपची अभिनेत्री बानू शकते.

साजिद आणि सलमान हे बोलत असताना प्रियांका घरांमध्ये होती. त्यामुळे तिला या सगळ्याची काहीच कल्पना नाही. परंतु तिच्या फॅन्ससाठी ही एक चांगली बातमी आहे. तिचे फॅन्स सलमानने प्रियांकाविषयी जे काही बोलले आहे त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच हा व्हिडिओ ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सलमानने अनेकदा प्रियंकाला समजावले आहे. तिने तिचे वागणे सुधारले तर ती खूप पुढे जाईल असे सलमामने पृयांकाला अनेकदा सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT