Salaar Movie Sooraj Hi Chhaon Banke Song Released You Tube
मनोरंजन बातम्या

Sooraj Hi Chhaon Banke Song Released: ‘सालार’मध्ये मैत्रीचे बंध दाखवणारं गाणं रिलीज, ‘सूरज ही चांहू बनके’ गाण्याला चाहत्यांनी दिला भरघोस प्रतिसाद

Salaar Movie 1st Song Released: प्रभासच्या ‘सालार’मधलं ‘सूरज ही चांहू बनके’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मैत्रीचे बंध असणाऱ्या या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Salaar Movie Sooraj Hi Chhaon Banke Song Released

येत्या २२ डिसेंबरला प्रभासचा ‘सालार’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. अशातच चित्रपटातलं ‘सूरज ही चांहू बनके’ (Sooraj Hi Chhaon Banke) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मैत्रीचे बंध असणाऱ्या या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘सालार पार्ट १: सीझफायर’च्या ट्रेलरनंतर चाहत्यांच्या भेटीला पहिलं गाणं आलं आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता ट्रेलरनंतर गाण्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गाण्याचं नाव ‘सूरज ही चांहू बनके’ असं असून हे गाणं दोन मित्रांवर चित्रित करण्यात आलं आहे. दोन मित्र म्हणजे प्रभास आणि सुकुमारन आहेत. या गाण्याचे लेखन रिया मुखर्जीने केलं असून मेनुका पेदुलने हे गाणं गायलं आहे. तर रवी बसरुरने संगीत दिलं आहे.

चित्रपटातील हे गाणं चाहत्यांना फारच भावलं आहे. या गाण्याच्या हिंदी व्हर्जनला यूट्यूबवर एका दिवसांत २७ लाख इतके व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं चाहत्यांना चांगलंच भावलं आहे. प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार पार्ट १: सीझफायर’ला सीबीएफसीकडून 'ए' सर्टिफिकेट मिळालं आहे. मैत्री, ॲक्शन ड्रामा असलेला हा चित्रपट २ तास ५५ मिनिटांचा आहे.

येत्या २२ डिसेंबर २०२३ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट जगभरामध्ये, हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. होम्बले फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT