Saif Ali Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan: सैफ अली खान विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; ४ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

Saif Ali Khan: सैफ अली खान यांनी मुंबईतील वांद्रे परिसरातील फ्लॅट ४.११ कोटी रुपयांना विकला आहे. दोन कमर्शियल जागांमधून त्यांना दरमहा २२.७६ लाख रुपये भाडे मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्यांच्या रिअल इस्टेट व्यवहारांमुळे चर्चेत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या प्रोपर्टीचा मालक असलेल्या सैफने मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील एक फ्लॅट ४.११ कोटी रुपयांना विकला आहे. विशेष म्हणजे, ही प्रोपर्टी त्याने जवळपास १९ वर्षांपूर्वी खरेदी केली होती. याशिवाय, त्याने अलीकडेच मुंबईतील दोन कमर्शियल जागा भाड्याने दिल्या असून, त्यातून दरमहा २२ लाख रुपयांहून अधिक भाडं त्याला मिळतं.

सैफ अली खान यांचा ४.११ कोटींचा व्यवहार

सीआरई मॅट्रिक्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील हाय-कॉन्स रेसिडेन्सीमधील एक फ्लॅट आणि दोन पार्किंग जागा ४.११ कोटी रुपयांना विकल्या आहेत. या फ्लॅटचे कार्पेट क्षेत्रफळ ७९७ चौरस फूट आहे. हा व्यवहार १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण झाल्याची माहिती आहे. या विक्रीसाठी २४.६६ लाख रुपयांचे स्टांप ड्यूटी भरण्यात आले आहे.

१९ वर्षांपूर्वी खरेदी केली होती प्रोपर्टी

सैफ अली खान यांनी २००७ मध्ये हाय-कॉन्स रेसिडेन्सीच्या वरच्या मजल्यावर सुमारे ६,००० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाची जागा ९.७ कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर या जागेचे तीन स्वतंत्र फ्लॅट्स तयार केले आले. त्यापैकी ७९७ चौरस फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट आता विकण्यात आला आहे.बाकीचे दोन फ्लॅट्सचे क्षेत्रफळ २,२०५ आणि २,९९७ चौरस फूट असल्याचे सांगितले जाते.

लाखोंचे भाडे

फ्लॅट विक्रीपूर्वी सैफ अली खान यांनी मुंबईतील अंधेरी-कुर्ला रोडवरील दोन कमर्शियल जागा दुर्वा फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाड्याने दिल्या आहेत. या जागांचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ ५,६९२ चौरस फूट असून, त्यासाठी दरमहा २२.७६ लाख रुपये भाडे त्याला मिळते.

सैफ अली खानच्या कामाबद्दल

कामाच्या आघाडीवर सैफ अली खान अलीकडेच अक्षय कुमारसोबत ‘हैवान’ या चित्रपटात दिसले होते. तसेच, पत्नी करीना कपूर खान यांच्यासोबत त्यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Horoscope: दिवाळीनंतर या ४ राशींवर पैशांचा वर्षाव होणार? नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Maharashtra News Live Update: - नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड रेकॉर्ड होणार

Unique Village : ना रस्ते, ना ट्रॅफिक, ना गाड्या! परीकथेतल्या गावासारखं सुंदर ठिकाण, जिथे लोक बोटीतून करतात प्रवास

राज्यात औषध विक्रेत्यांवर तुकाराम मुंढेंची कारवाई; ७१ परवाने निलंबित, २९ रद्द; नाशिकमध्येही 11 लाखांचा मसाला जप्त

Saree Draping Styles: कॉलेजपासून पार्टीपर्यंत दिसा स्टायलिश! या ७ साडी ड्रेपिंग स्टाइल्स करतील तुमचा लूक खास

SCROLL FOR NEXT