Saif Ali Khan Seriously Injured 
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Health Update : सैफच्या मानेवर,हातावर सपासप वार, ६ जखमा, लिलावतीमध्ये सर्जरी

Saif Ali Khan Suffers Deep Injuries, Undergoing Treatment at Lilavati : सैफ अली खान याच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या मानेला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Saif Ali Khan Health Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरात चाकू हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालाय. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली. चोराने सैफ अली खान याच्यावर सहा ते सात वेळा चाकून सपासप वार केले. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत, त्यामधील दोन जखमा अतिशय खोलवर असल्याचे समजतेय.

सैफ अली खान आणि चोरामध्ये मध्यरात्री अडीच वाजता झटापट झाली. चोराने सैफ अली खान याच्यावर सपासप चाकूने वार केला. सैफ अली खान याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर चोराकडून वार करण्यात आले. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया झाल्याचे समजतेय. (Saif Ali Khan was stabbed six times, with two of the stabbings causing serious injuries)

सैफ अली खान याच्या हाताला आणि मानेला खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याशिवाय पाठीच्या कण्यावरही जखम झाली आहे. सैफच्या मानेला १० सेंटीमीटर जखम झाली आहे. वांद्रे येथील ३ बीएचके या अलिशन घरात सैफ अली खान होता, त्यावेळी मध्यरात्री चोर घुसले. चोरामध्ये आणि सैफमध्ये झटापट झाली. यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याशिवाय कर्मचारीही जखमी झाल्याचे समजतेय.

वांद्रे येथे सैफ अली खान याचं अलिशान घर आहे. याच घरात त्याच्यावर चोराने धारधार शस्त्राने हल्ला केला. मध्यरात्री जखमी अवस्थेत सैफ अली खान याला उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यता आले. सर्जरी करून सैफच्या पाठीतलं शस्त्र काढण्यात आलेय. त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया सुरू आहे. सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती अधिकृत मीडिया टीमकडून देण्यात आली आहे. सैफ अली खान याच्याकडून चाहत्यांना संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आलेय.

पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहेत. पोलिसांकडून कर्मचाऱ्यांचे फोन ताब्यात घेतले आहेत. चौकशीसाठी तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेय. सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर कर्मचाऱ्यासोबतही हातापायी झाली असे वाटतेय. चोराच्या हल्ल्यामध्ये एक कर्मचारी जखमी झालाय. पोलिसांकडून सैफ अली खान याच्या घरातील कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात येत आहे. ज्यावेळी हल्ला झाला, चोर घरात शिरले, त्यावेळी कर्मचारी काय करत होते? त्याबाबतची माहिती घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT