Sai Pallavi Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Pallavi Video: 'झिंग झिंग झिंगाट...' साई पल्लवीच्या डान्सने चाहते झाले 'सैराट'

Sai Pallavi Zingat Dance Video: साईच्या बहिणीचा विवाहसोहळा पार पडला. या दरम्यान साईने मराठी गाण्यावर डान्स करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Manasvi Choudhary

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सध्या चांगलीच चर्चेत आहे.साई पल्लवी केवळ साऊथमध्येच नाही तर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतही लोकप्रिय आहे. दमदार अभिनयासह साईने तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. नुकतंच साईच्या बहिणीचा विवाहसोहळा पार पडला. या दरम्यान साईने मराठी गाण्यावर डान्स करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.

'सैराट' या चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर साईने सुंदर असा डान्स केला आहे. साईच्या दिलखेचक अंदा आणि नृत्य कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर साईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यापूर्वी लग्नसोहळ्यातच साईने अप्सरा आली या लावणीवर ठेका धरला होता. जो तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

या व्हिडीओमध्ये साईने बहिणीच्या लग्नसमारंभात संगीत सोहळ्यात परिवारासोबत झिंगाट या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. ट्रेडिशनल लूकमध्ये साईने निळ्या रंगाचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो ड्रेस घातला आहे. ड्रेसवर मॅचिंग ज्वेलरी घातली आहे.सोशल मीडियावर साई पल्लवीच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. साई पल्लवीच्या कामाविषयी बोलायचं तर, साई आगामी काळात नितेश कुमार यांच्या 'रामायण' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात साई सीतेची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT