Mom To Be Sai Lokur share video  Instagram @sai.lokur
मनोरंजन बातम्या

Sai Lokur Pregnant: सईबाईचं डोहाळ पुरवा... बिग बॉस फेम अभिनेत्री लवकरच आई होणार

Sai Lokur Post: अभिनेत्री सई लोकूरने तिच्या सोशल मीडियावरून ही गोड बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Pooja Dange

Sai Lokur Shared Pregnancy News:

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूरने आनंदाची बातमी शेअर केली हवं. सई आणि तिचा पती तिर्थदीप रॉय यांच्या जीवनात नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे.

अभिनेत्री सई लोकूरने तिच्या सोशल मीडियावरून ही गोड बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सई लोकूर आपल्याला चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. सोशल मीडियावर सई नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सई लोकूरने काही वेळेपूर्वीच तिचे आणि नवरा तिर्थदीप रॉयसोबतचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. सईने प्रेगन्सी किट, बाळाची सोनोग्राफी प्रिंट आणि बलूनसह फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये तिचा नवरा देखील आहे. आणि दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

ही पोस्ट शेअर करत सईने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "इवलूशे हात, इवलूशे पाय प्रेमाने वाढवणार आमच्या कुटुंबाची साईज... आम्‍हाला तुम्‍हाला कळवण्‍यास अत्‍यंत छान होत आहे की, आमच्या आनंदाचा एक मौल्यवान भाग लवकरच येणार आहे.. तुमच्या प्रेमाने, हास्याने आणि आनंदाने आमचं आयुष्य भरून टाका!" अशा भावना सईने व्यक्त केल्या आहेत. (Latest Entertainment News)

सई लोकूरने तीन पोस्ट केल्या आहेत. या तिन्ही पोस्ट तिच्या फॅन्स कौतुकच वर्षाव केला आहे. सर्वजण या दोघांचे अभिनंदन करत आहेत. सई आणि तिचा नवरा त्यांच्या जीवनात येणाऱ्या या चिमुकल्यामुळे खूप आनंदी आहेत.

सई लोकूर बिग बॉस मराठीच्या २ सीजनमध्ये होती. अभिनेता पुष्कर जोश आणि सईची मैत्री आपल्याला या सीजनमध्ये पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayushman Bharat card: घर बसल्या कसं काढू शकता आयुष्मान भारत कार्ड

Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरेगावी आगमन

BMC Election Explainer : मुंबईत ठाकरेंचीच सरशी? महायुतीचं टेन्शन वाढलं; ७० वॉर्ड निर्णायक, राज ठाकरे किंगमेकर ठरणार?

सिल्की आणि शाईनी केसांसाठी आता घरच्या घरी करा हेअर स्पा

SCROLL FOR NEXT