Sachin Pilgaonkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sachin Pilgaonkar: 'उर्दू ही हिंदूंचीच भाषा...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

Sachin Pilgaonkar: राठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतंच दिलेलं विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Shruti Vilas Kadam

Sachin Pilgaonkar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर यांनी नुकतंच दिलेलं विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. एका उर्दू साहित्यिक कार्यक्रमात  “मराठी माझी मातृभाषा आहे, पण मी विचार उर्दूतूनच करतो. एखाद्याने मला रात्री ३ वाजता उठवलं तरीही उर्दूमध्येच उत्तर देतो.”  असे विधान केलं त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं त्यावर त्यांनी आपली बाजू मांडत आणखी एक विधान केलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगावकर यांनी म्हटलं की, “उर्दू ही हिंदूंची भाषा आहे”. हे विधान समोर आल्यानंतर चाहत्यांपासून ते नेटिझन्सपर्यंत सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की, “उर्दू ही भाषा हिंदुस्थानी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ती हिंदू-मुस्लिम दोघांच्याही परंपरेत मिसळलेली आहे. ही भाषा ऐकली की मनात सौंदर्य आणि कोमलता जागृत होते.” सचिन पिळगावकर यांचं हे विधान जरी काहींना वादग्रस्त वाटलं, तरी अनेकांनी त्यांचं म्हणणं एकतेचा संदेश देणारं असल्याचं म्हटलं. उर्दू ही केवळ एका समुदायापुरती मर्यादित न राहता भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं.

या विधानामुळे पुन्हा एकदा भाषेच्या ओळखीबद्दल आणि धर्माशी तिचं नातं याबाबत चर्चा रंगली आहे. अनेक विद्वान आणि साहित्यप्रेमींनी यावर भाष्य करत म्हटलं की, “भाषा ही माणसाला जोडणारी असते, विभाजित करणारी नाही.” दरम्यान, पिळगावकर यांच्या या मतांमुळे त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की कला, संस्कृती आणि भाषा या धर्माच्या चौकटीत कधीच बंदिस्त होऊ शकत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर #SachinPilgaonkar हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सचिन पिळगांवकरांनी मराठीसह ‘शोले’, ‘नदिया के पार’, ‘बालिका वधू’, ‘बचपन’, ‘ब्रह्मचारी’, ‘सत्ते पे सत्ता’ सह अनेक गाजलेले बॉलीवूड चित्रपटात काम करत आपली छाप सोडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT