Sachin Pilgaonkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sachin Pilgaonkar: राष्ट्रपतींकडून पुरस्कार, नंतर पंडित नेहरूंनी हाक मारली; सचिन पिळगावकरांनी सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

Sachin Pilgaonkar: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये एक खास आणि ऐतिहासिक क्षण उलगडला आहे.

Shruti Vilas Kadam

Sachin Pilgaonkar: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींमध्ये एक खास आणि ऐतिहासिक क्षण उलगडला आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी "हा माझा मार्ग एकला" या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनय करत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता.

हा पुरस्कार त्यांना १९६२ साली राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. पुरस्कार समारंभात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देखील उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सचिन मंचावरून खाली येत असताना पंडित नेहरूंनी त्यांना थांबवले, जवळ बोलावले आणि त्यांच्या शेरवानीवर स्वतःचा गुलाबाचा फूल माझ्या शेरवानीवर लावले. त्यावेळी नेहरूंनी त्यांच्याकडे पाहत प्रेमाने म्हटले, "तू खूप मोठा होशील".

सचिन पिळगांवकर यांनी या आठवणी एका मुलाखतीत शेअर करताना सांगितले की, तेव्हा मी पाच वर्षांचा होतो. पुरस्कारासाठी माझं नाव पुकारल होतं. तेव्हा त्यांना वाटलं की, १२-१३ वर्षांचा एक मुलगा असेल पण मला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला तिथे पंडित जवाहरलाल नेहरू देखील होते. मला सांगितल्यानुसार मी पुरस्कार घेतला, त्यांना नमस्कार केला आणि जात होतो. तितक्यात माझ्या कानावर एक आवाज पडला. 'सुनो...' मी पाहिलं तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. मी त्यांच्या पाया पडलो. तेव्हा त्यांनी प्रोटोकॉल मोडत मला मांडीवर बसवलं, त्यांच्या शेरवानीवर स्वतःचा गुलाबाचा फूल माझ्या शेरवानीवर लावलं. त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि मला म्हणाले, ‘जाओ..बहुत बड़े बनोगे’. नंतर मी आईकडे गेलो. तेव्हा ती रडत होती. मला हे तेव्हा समजलं नव्हतं...असा हा खास प्रसंग त्यांनी एका मुलाखतीत सांगितला.

हा प्रसंग केवळ एका बालकलाकाराचा गौरव नव्हता, तर भारताच्या सर्वोच्च नेत्यांकडून मिळालेली एक प्रेरणादायी शाबासकी होती. सचिन म्हणतात, “नेहरूजींच्या गुलाबापेक्षा मौल्यवान गोष्ट माझ्यासाठी काहीच नव्हती.” हा क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि प्रेरणादायी क्षण असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘नाशिकची स्पेशल मिसळ थाळी’; चव अशी की पोट भरून खातील! 

SCROLL FOR NEXT