Saam Music Latest Songs Saam tv
मनोरंजन बातम्या

Saam Music : संगीताच्या विश्वात नव्या सुरांची साद; 'साम म्युझिक' युट्यूब चॅनेलची दिमाखदार सुरुवात

Saam Music Latest Songs : संगीतप्रेमींसाठी ‘साम म्युझिक’ या नव्या यूट्यूब चॅनेलची सुरुवात झाली आहे. रोमँटिक गाणी, भक्तिगीते, भावगीते, गझल आणि सणासुदीच्या गाण्यांचा आनंद आता एकाच व्यासपीठावर घेता येणार आहे.

Namdeo Kumbhar

Saam Music YouTube Channel Launched: संगीताच्या जगात नवनवीन प्रयोग आणि मनाला भिडणाऱ्या सुरांचा शोध घेण्यासाठी नेहमीच काहीतरी खास असावे लागते. त्याच उद्देशाने संगीतप्रेमींसाठी एक नवीन व्यासपीठ डिजिटल विश्वात दाखल झाले. 'साम म्युझिक' (Saam Music) नावाचे हे नवीन यूट्यूब चॅनेल रसिकांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे दर्जेदार व्हिडिओ घेऊन आले आहे.

रोमँटिक गाणी, भक्तीगीते, भावगीते, थीम-बेस्ड ट्रॅक्स आणि सणासुदीच्या गाण्यांवर 'साम म्युझिक'कडून विशेष भर दिला जात आहे. तरुणांपासून ते वयोवृद्ध आणि महिलांपर्यंत प्रत्येक वर्गाच्या पसंतीस उतरतील अशा गाण्यांची निर्मिती दर आठवड्याला केली जात आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेली सर्व गाणी रसिकांच्या पसंतीस उतरली असून त्यांना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

या चॅनेलवरील दिल की पुकार कौन सुनेगा? हे नुकतेच रिलीज झालेले गाणे तरुणाईच्या विशेष पसंतीस उतरले आहे. मनातील खामोशी, एकटेपण आणि न व्यक्त होणाऱ्या भावनांना अतिशय सुरेख शब्द आणि सुरांच्या माध्यमातून या गाण्यात उत्तमरीत्या मांडण्यात आले आहे.

तुम्हालाही जर वेगवेगळ्या शैलीतील दर्जेदार संगीत आणि मनाला स्पर्श करणारी गाणी ऐकायची असतील, तर फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर या नव्या चॅनेलला नक्की भेट द्या. आगामी काळात रसिकांच्या भेटीला आणखी नवीन गाणी येणार असून, भविष्यात 'स्पॉटीफाय' (Spotify) या प्रसिद्ध म्युझिक ॲपवरही 'साम म्युझिक वर्ल्ड'ची गाणी प्रसारित केली जाणार आहेत. दर्जेदार संगीताचा आनंद घेण्यासाठी आजच चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक व कमेंट करून आपला पाठिंबा नक्की द्या!

तुझे रूप चित्ती राहो | Tujhe Roop Chitti Raho

दिल की पुकार कौन सुनेगा? | Aisa Kise Dhoondhun Main

मारो दांडिया! | Maro Dandiya

साकी अब तेरी मयकदे की ज़रूरत ही कहाँ | Romantic Ghazal

MUSAVVIR | मुसव्विर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे, विदर्भ अन् मराठवाड्यात कुणाचा आमदार? Exit पोलचा धक्कादायक अंदाज, शिक्षक-पदवीधर मतदारसंघात गुलाल कोण उधळणार?

BJP vs Shivsena : माझ्याकडे रामदास कदमांच्या सिक्रेट क्लिप्स; 'फोटो बॉम्ब'नंतर भाजपचा खळबळजनक इशारा

3 बड्या अधिकाऱ्यांचे निलबंन; एकनाथ शिंदेंचे निर्देश; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Arrested : महाराष्ट्र हादरला! भाजप शहराध्यक्षला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

पुणेकरांनो रस्त्यावर फटाके फोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार; दिवाळीआधी पोलिसांकडून कडक इशारा

SCROLL FOR NEXT