S S Rajamouli Film In Deepika- Aamir Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika- Aamir Khan in SS Rajamouli's Film: राजामौलींच्या चित्रपटात दिसणार अमिर साकारणार ‘ही’ भूमिका, दीपिकालाही मिळणार संधी ?

S S Rajamouli Film Lead Actors: राजामौलींच्या नव्या चित्रपटाची सध्या तयारी सुरू आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना एस.एस. राजामौलींच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, अशातच काही सेलिब्रिटींची नावं समोर आले आहेत.

Chetan Bodke

Aamir Khan Villain In Rajamouli’s Next Film: ‘RRR’ चित्रपटाला ऑस्कर मिळवून देणाऱ्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या नावाची चर्चा आजही कायम आहे. चित्रपटाने फक्त भारतात नाही तर, अवघ्या जगभरात आपल्या चित्रपटाचा डंका वाजवला. अशातच आता राजामौलींच्या नव्या चित्रपटाची सध्या तयारी सुरू आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना एस.एस. राजामौलींच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. लवकरच त्यांच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सोबत बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोण झळकणार आहे. ‘कॅरी ऑन जट्टा ३’ या चित्रपटाच्या ट्रेलर प्रसंगी आमिर खानचं ते सिक्रेट रिव्हिल झालं आहे.

बॉलिवूडमध्येच नाही तर सर्वत्रच एस. एस. राजामौलींच्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होते. ‘RRR’ चित्रपटाला ऑस्कर मिळवून दिल्यानंतर दिग्ददर्शक एस. एस. राजामौलींच्या चित्रपटांत अनेक सेलिब्रिटींना काम करण्याची इच्छा आहे. लवकरच त्यांच्या आगामी चित्रपटात आमिर खान सोबत दीपिका पदुकोण झळकणार आहे. यावेळी आमिरने क्षेत्रीय भाषांमधील त्याच्या अभिरुचीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने चांगली कथा मिळाली तर, नक्कीच त्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करेल असे त्याने सांगितले.

चित्रपटाची कथा जर चांगली असेल तर, नक्कीच चित्रपटात काम करेल. चित्रपटाविषयी त्याने सांगताना, “माझी आता कोणत्याही भाषेत काम करण्याची तयारी आहे. जर चांगली कथा असेल तर, मी नक्कीच काम करेल. मला ‘लाल सिंग चड्ढा’ने खूपच मानसिक त्रास दिला. त्यामुळे आता मी चांगल्या चित्रपटाच्या शोधात आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान त्याचा पुढचा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यासोबत करणार आहे.

मार्च महिन्यात नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर राजामौली यांच्या चित्रपटांची बरीच चर्चा सुरू आहे. राजामौली यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरु केली असून त्यासाठी त्यांनी कास्टिंग वर काम सुरु केले आहे. यात आमिर खानचे नाव पुढे आले असून तो खलनायकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या चित्रपटामध्ये दीपिकाही दिसणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

राजामौली यांचा हा तोच चित्रपट आहे जो त्यांनी त्यांच्या मागील 'RRR' चित्रपटानंतर लगेचच बनवण्याची घोषणा केली होती. साऊथचा स्टार अभिनेता महेश बाबूने या चित्रपटासाठी आपल्या तारखा आधीच लॉक केल्या आहेत. राजामौलीसोबत महेश बाबूचा हा पहिलाच चित्रपट असेल. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम पूर्ण झाले आहे आणि राजामौली यांनी लोकेशन्स वगैरे फायनल केले आहेत. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

Accident : कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाताना काळाचा घाला, आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Pelvic floor exercises: प्रसूतीनंतर लघवीवर नियंत्रण राहत नाही? गर्भावस्थेत केलेला हा सोपा व्यायाम ठरू शकतो फायदेशीर

SCROLL FOR NEXT