Sayali Sanjeev's Comment On Ruturaj Gaikwad Winning Post Saam TV
मनोरंजन बातम्या

Sayali Sanjeev Comment On Ruturaj Post: सायलीचा विषय क्लोज, ऋतुराजने केली नवी सुरूवात; Winning पोस्टची रंगली चर्चा

Ruturaj Gaikwad Share Post: काल परवापर्यंत सर्वजण ऋतुराजचं नाव अभिनेत्री सायली संजीवशी जोडत होते.

Pooja Dange

Ruturaj Gaikwad Share Post With His Fiance: अभिनेत्री सायली संजीव आणि क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांची नेहमी चर्चा असते. काल चेन्नईने आयपीएल २०२३मध्ये विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड या संघातील बेस्ट बॅटमॅन्स आहे. जिंकल्यानंतर ऋतुराज विजयची पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टमुळे अनेकांच्या पोटात गोळा नक्की आला असणार. कारण ऋतुराजने या पोस्टच्या माध्यमातून खूप मोठी घोषणा केली आहे.

ऋतुराजने आयपीएल जिंकल्यानंतर दोन पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तो धोनीसोबत दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये ऋतुराजने आयपीएलची ट्रॉफी हातात घेऊन फोटो काढला आहे. या दोन्ही फोटोंमध्ये एक व्यक्ती आहे. फोटोतील ती व्यक्ती ऋतुराजची होणारी पत्नी आहे. (Latest Entertainment News)

ऋतुराजने पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, माझ्या आयुष्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे, आनंद साजरे करण्यासाठी काय सुंदर वर्ष आहे!

ऋतुराजने केलेल्या पोस्टने अनेकजण गोंधळून गेले आहेत. कारण काल परवापर्यंत सर्वजण ऋतुराजचं नाव अभिनेत्री सायली संजीवशी जोडत होते आणि अचानक त्यांचे त्याच्या लाईफ पार्टनरशी सर्वांना ओळख करून दिली आहे. उत्कर्षा असे ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. विशेष म्हणजे ऋतुराजच्या या पोस्टवर अभिनेत्री सायली संजीवने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री सायली संजीवने ऋतुराजच्या पोस्टवर 'दोघांचे मनःपूर्वक अभिनंद उत्कर्षा आणि ऋतुराज' अशी कमेंट केली आहे. सायलीसह ऋतुराजच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे, ईशा केसकर, सलील कुलकर्णी यांनीही कमेंट केली आहे.

या सर्व प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तसेच ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीविषयी जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस -मनसे आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांचं पुन्हा भाष्य

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT