Rupali Bhosle Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rupali Bhosle: राहायला घर नाही, खायला पैसे नाहीत, पावसात भिजून काढले दिवस, रूपाली भोसलेचा प्रेरणादायी प्रवास वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Rupali Bhosle: मराठीसह हिंदा मालिकांमध्ये रूपालीने काम केले आहे. अस असलं तरी रूपालीचा बालपण ते आतापर्यंतचा प्रवास संघर्षानी भरलेला आहे.

Manasvi Choudhary

रूपाली भोसले ही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मॉडेल तसेच थिएटर आर्सिस्ट म्हणून रूपाली भोसलेची ओळख आहे. रूपालीने अत्यंत कमी कालावधीत सिनेसृष्टीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदा मालिकांमध्ये रूपालीने काम केले आहे. अस असलं तरी रूपालीचा बालपण ते आतापर्यंतचा प्रवास संघर्षानी भरलेला आहे.

सध्या रूपाली भोसले आई कुठे काय करते या तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. संजनाच्या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. तिची मालिका सर्वांनाच आवडते. रूपाली भोसले मुंबईत लहानाची मोठी झाली. तिचा जन्म २९ डिसेंबर १९८३ मध्ये झाला आहे. मुंबईतील सेंट थॉमस सेकेंडरी स्कूलमधून तिने शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठातून घेतले.

२००७ मध्ये रूपालीने तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. सुरूवातील रिस्क या हिंदी चित्रपटात ती दिसली. यानंतर २००९ मध्ये मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून तीने मराठी विश्वात पाऊल टाकलं. २०१२ मध्ये आलेल्या 'दोन किनारे दोघी आपण' आणि कन्यादान मालिकेतही ती दिसली. दरम्यान आयुष्यमान भव या हिंदी मालिकेतही तिने अभिनय केलाय.

रूपालीने अनेकदा तिच्या मुलाखतीत बालपणाविषयी सांगितलं आहे. लहानपणी त्यांच्या कुटुंबावर मोठे मोठे संकट आले. रूपाली मुंबईच्या बीडीडी चाळीत लहानाची मोठी झाली. यावेळी रूपालीच्या काकांनी त्यांची पैशांची फसवणूक केली होती. यामुळे रूपालीचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलेलं. दरम्यान पावसाच्या दिवसात रूपाली भोसले यांनी राहण्यासाठी घर नव्हते. त्याच्याकडे दोन वेळच्या जेवणाचे पैसे नव्हते. रूपाली व तिचा भाऊ पावसात भिजू नये म्हणून आईने डोक्यावर ताडपत्री धरली होती. मात्र असे असताना जिद्दीने रूपाली भोसले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Shocking : भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, राजकारणात मोठी खळबळ

भाजपमध्ये पडली उभी फूट, मोदींना हटवण्यासाठी षडयंत्र; बड्या राजकीय नेत्याच्या आरोपाने राजकारणात खळबळ

"माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत...", बॉलिवूडची प्रसिद्ध Actress असं का म्हणाली?

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT