Rubina Dilaik Pregnancy Rumours Instagram @rubinadilaik
मनोरंजन बातम्या

Rubina Dilaik Pregnant: 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री रुबिना होणार आई; 'गुड न्यूज'बाबत इतकं गुपित का?

Rubina Dilaik Pregnancy Rumours: रुबीनाने तिच्या वाढदिवशी काही फोटो पोस्ट केले होते त्यात तिचे बेबी बंप दिसत होते.

Pooja Dange

Rubina Dilaik Expecting Their First Child:

अभिनेत्री रुबीना दिलैक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रुबीना प्रेग्नंट आहे, अशा कमेंट नेटकरी तिच्या फोटोंवर करत आहेत. नेटकऱ्यांनी तिचा बेबी बंप नोटीस देखील केला आहे.

अखेर रुबीनाने यावर मौन सोडले आहे. रुबीनाने तिच्या प्रेगन्सीचे वृत्त कन्फर्म केले आहे. तसेच ती तिची प्रेग्नसी एन्जॉय करत आहे.

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रुबीना आणि अभिनव यांच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे. रुबीनला चौथा महिना सुरू आहे. पुढच्या वर्षी रुबीना तिच्या बाळाला जन्म देईल.

रुबीना दिलैक तिच्या जीवनातील या नवीन टप्यामुळे खूपच उत्सुक आहे. अभिनव आणि रुबीनाने हे गोष्ट प्रायव्हेट ठेवली आहे. त्यांना हा काळ एन्जॉय करायचा आहे. त्यांचे मते जर त्यांनी हि गोष्ट सांगितली ते दोघे या प्रवासाचा हवा तास आनंद घेऊ शकत नाही. तसेच या सर्वापासून दूर जाण्यासाठी रुबीनाने यूएसला जायचा प्लॅन केला आहे.

काही दिवसांपूर्वी रुबिना - अभिनव एका मॅटर्निटी क्लीनिक बाहेर दिसले होते. त्यानंतर रुबीनाच्या प्रेग्नसीच्या चर्चांना सुरुवात झाली. रुबीनाने तिच्या वाढदिवशी काही फोटो पोस्ट केले होते त्यात तिचे बेबी बंप दिसत होते. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला प्रेग्नंसीविषयी विचारण्यास सुरुवात केली. तर आता रुबीनाच्या लेटेस्ट व्लॉंगमध्ये देखील बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

रुबीनाला फिक्शन शो ऑफर करण्यात आला होता. परंतु प्रेगन्सीमुळे तिने या शोला नकार दिला. रुबीनाच्या या प्रेग्नसीचे वृत्त किती खरे आणि किती खोटे हे आपल्याला कालांतराने कळेल.

जून २०२८ मध्ये रुबीना आणि अभिनव यांचे लग्न झाले. या जोडप्याच्या लग्नाला ५ वर्ष झाली असून ते त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत करतील अशी चर्चा आहे.

रुबीना 'छोटी बहू' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आली. तर ती आता पंजाबी चित्रपटातून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. 'चाल भज चलिए' असे या चित्रपटाचे नाव आहे. रुबीना बिग बॉस १४ची विजेती आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT