Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळीला दादागिरी नडली; भाऊच्या धक्क्यावर मिळाली कुणालाही न दिलेली शिक्षा

Bigg Boss Marathi 5 : सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी'ची चर्चा पाहायला मिळत आहे. निक्कीच्या दादागिरीमुळे बिग बॉस घरातील वातावरण बिघडले आहे. आता रितेश भाऊ काय निर्णय देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Shreya Maskar

सध्या 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) चांगलाच गाजताना दिसत आहे. या सीझनमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे पाहायला मिळत आहेत. भांडण म्हटलं की, निक्कीचं नाव पहिलं येत. आजवर निक्कीने बिग बॉसच्या घरात अनेक भांडणे केली. दिवसेंदिवस तिची दादागिरी वाढताना दिसत आहे. बिग बॉसचा हा सीझन निक्कीने आपल्या भांडणामुळे गाजवला आहे. सध्या प्रेक्षकवर्ग घरातल्या सदस्यांचे नीट निरीक्षण करत आहे. प्रेक्षकांना निक्कीचा स्वभाव खटकायला लागला आहे.

या आठवड्यात निक्कीने घरात नवा धुमाकूळ घातला. तिने घरातील कामं करण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून जान्हवी आणि निक्कीमध्ये भांडण देखील पाहायला मिळाले. आता नवीन आठवड्यात कॅप्टनपदी सूरजची निवड करण्यात आली आहे. सूरजच्या कॅप्टनसीमुळे घरातील बरेच लोक आनंदी पाहायला मिळत आहेत. सूरजच्या कॅप्टनसी काळातही निक्की (Nikki Tamboli) जोरदार भांडताना दिसत आहे. तिने आता परत आर्यासोबत भांडण केले आहे. चहा बनवण्यावरून आर्या आणि निक्कीमध्ये भांडण झाले. निक्की येथे सुद्धा घरातील कामे करण्यास नकार देते. ती स्वतःची चहाची भांड घासत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा घरात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

'बिग बॉस मराठी'च्या नवीन गणेशोत्सव प्रोमोमध्ये रितेश नक्कीला खडे बोल सुनावताना दिसणार आहे. रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) तिला घरातील वर्तणुकीवर जाब विचारणार आहे. 'घरात कोणाचाही बाप काढायचा नाही.' अशा कठोर शब्दात रितेशने निक्कीला सुनावले आहे. रितेश यात म्हणतो की, 'कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही' अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. असे बोलून रितेशने निक्कीला दोन कठोर शिक्षा देखील सुनावल्या आहेत. पहिली म्हणजे निक्की यापुढील बिग बॉसच्या प्रवासात कधीही कॅप्टन होणार नाही. आता भाऊ दुसरी शिक्षा काय देणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहीले आहे. निक्की -आर्याचे भांडण इतके टोकाला जाते की, निक्कीने आर्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करते. नक्की बोलते की, 'कोणाचा बाप आला तरी मी ऐकणार नाही.' यावर आर्याने प्रचंड संतापून 'बाप काढायचा नाही…' असं बोलते. यावर नेटकरी देखील प्रचंड भडकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT