Riteish Deshmukh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh : "...घरात मी जिनिलीयाचा गुलाम", रितेश देशमुख असं का म्हणाला? पाहा VIDEO

Riteish Deshmukh Funny Video : रितेश देशमुख आणि जिनिलिया महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. नुकतेच रितेशने 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आहे.

Shreya Maskar

रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) आणि जिनिलिया (Genelia) महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहेत. बॉलिवूडची ही पावर जोडी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रितेश आणि जिनिलिया कायम एकमेकांचा आदर करताना पाहायला मिळतात. नुकताच 'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' पार पडला आहे. याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक डान्स, पुरस्कार आणि कॉमेडी पाहायला मिळाली आहे.

'झी चित्र गौरव पुरस्कार 2025' या भन्नाट पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघ यांनी केले. या सोहळ्याला कलाविश्वातील मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. अनेक मोठ्या कलाकारांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात रितेश आणि अमेयची हटके जुगलबंदी पाहायला मिळत होती. रितेश देशमुखने मराठमोळ्या स्टाइलने स्टेजवर ग्रँड एन्ट्री केली.

स्टेजवर रितेश देशमुख आणि अमेय वाघमध्ये मजेशीर संवाद घडतो. अमेय रितेशला विचारतो की, "जिनिलिया वहिनींना पुरणपोळी बनवता येते का?" यावर रितेश उत्तर देत म्हणतो की, "दोन-दोन पुरणपोळ्या खातात..." त्यावर पुन्हा अमेय विचारतो, "पण पुरणपोळी बनवता येते का त्यांना?" त्यावर रितेश म्हणतो, "त्यासाठी त्यांनी शेफ ठेवलाय ना…त्याचे नाव आहे रितेश... बाहेर लोक ठोकतात सलाम, घरात मी जिनिलियाचा गुलाम"

देशमुखच्या या उत्तरानंतर सर्वजण हसू लागतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडिया देखील खूप व्हायरल होत आहे. 2012मध्ये रितेश आणि जिनिलियाने लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं देखील आहेत. तसेच रितेश आणि जिनिलियाने एकत्र खूप छान चित्रपट केले आहेत. त्यांचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. ते कायम सोशल मिडियावर त्यांच्या कॉमेडी रील्स शेअर करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT